Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचं मानधन किती? निक्कीपासून ते सूरज चव्हाणपर्यंत, कुणाला किती फी मिळाली?
Bigg Boss Marathi 5 Contestant Fee : वर्षा उसगावकर, अरबाज पटेल, अभिजीत सावंत हे सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक असण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. बिग बॉसच्या घरातील यंदाचा सर्वात महागडा स्पर्धक कोण आहे ते जाणून घ्या.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सेलिब्रिटींपासून सोशल मीडिया एन्फ्लुएंसरही बिग बॉसच्या घरात सामील झाले आहेत. बिग बॉसच्या घरात एकापेक्षा एक सदस्य पाहायला मिळत आहेत. दरम्यान, बिग बॉस मराठी 5 मधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक वर्षा उसगावकर, अरबाज पटेल, अभिजीत सावंत हे सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक असण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र, बिग बॉसच्या घरातील यंदाचा सर्वात महागडा स्पर्धक कोण आहे ते जाणून घ्या.
बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांची कमाई किती?
बिग बॉस मराठी 5 मध्ये पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीची वर्षा उसगांवकर सोबतचा राडा, नॉमिनेशन टास्क आणि पहिलं एलिमिनेशनदेखील पाहायला मिळालं, ज्यामध्ये पुरुषोत्तम दादा पाटील, शोमधून बाहेर पडणारे पहिले स्पर्धक ठरले. दुसरीकडे, बिग बॉस मराठी 5 चा दुसरा आठवडा देखील धमाकेदार नोटवर सुरू झाला ज्यामध्ये स्पर्धक बिग बॉस करंसीसाठी आणि कॅप्टन्सीसाठी देखील भांडताना दिसले. यादरम्यान, या सीझनमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक कोण आहे, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
वर्षा उसगांवकर यांची बिग बॉसमधील कमाई किती?
मीडिया रिपोर्नुसार, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सदस्यांमध्ये वर्षा उसगांवकर यांचं नाव चर्चेत होतं. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना दर आठवड्याला 2.50 लाख रुपये मानधन आकारत आहेत. पण, असं असलं तरी त्या यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सदस्य नाहीत. यानंतर स्प्लिट्सविला फेम अरबाज पटेल दर आठवड्याला 1.25 लाख रुपये फी घेत आहे.
सूरज चव्हाणला बिग बॉससाठी किती फी मिळाली?
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी रिल स्टार सूरज चव्हाणला आठवड्याला फक्त 25 हजार मानधन मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. छोटा पुढारी धनश्याम दरोडे 50 हजार तर, धनंजय पोवार 60 हजार फी घेत आहे. याशिवाय, वैभव चव्हाण दर आठवड्याला 70 हजार रुपये घेत आहे. अभिनेत्री योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव प्रत्येक आठवड्याला प्रत्येकी एक-एक लाख रुपये कमावत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय, निखिल दामले 1.25 लाख आणि पॅडी कांबळे 2 लाख कमावत असल्याचं बोललं जात आहे. पुरुषोत्तम दादा पाटील यांनी एका आठवड्यासाठी 1.35 लाख रुपये आकारल्याचं सांगितलं जात आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात महागडा स्पर्धक कोण?
निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठी 5 ची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निक्की तांबोळी लोकप्रिय रिॲलिटी शोच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला 3.75 लाख रुपये फी आकारली आहे, त्यामुळे ती यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक बनली आहे. गायक अभिजीत सावंत हा बिग बॉस मराठीतील दुसरा सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक आहे. अभिजीत सावंत दर आठवड्याला 3.50 लाख रुपये मानधन घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :