Bigg Boss Marathi : "टीम A मध्ये कुणी विचारणार नाही, म्हणून अभिजीत टीम B मध्ये", अरबाज अन् वैभवनं अंकिताला सगळंच सांगितलं
Bigg Boss Marathi New Season Day 25 : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांचा 25 वा दिवस सुरु असून दररोज सदस्यांमध्ये नवीन वाद आणि राडा पाहायला मिळत आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : बिग बॉस मराठीचा सध्या चौथा आठवडा सुरु असून दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा कल्ला वाढताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांचा 25 वा दिवस सुरु असून दररोज सदस्यांमध्ये नवीन वाद आणि राडा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात टीम ए आणि टीम बी अशा टीम दिसून येत आहे.
"अभिजीत अटेंशन सीकर"
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात एकीकडे टीम एमध्ये निक्की आणि वैभवचा दबदबा दिसत आहे. तर, दुसरीकडे टीम बीमध्ये अभिजीत नेतृत्व करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नवीन प्रोमोमध्ये अभिजीत सावंतवरुन अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, वैभव चव्हाण यांच्यात चर्चा सुरु आहे. किचनमध्ये ही चर्चा सुरु असताना धनश्या:मही तिथेच असतो. अभिजीत अटेंशन सीकर आहे, म्हणजेच लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यासाठी सगळं करतोय, असं अरबाज आणि वैभव अंकिताला सांगत आहेत
नेमकं काय घडलं?
अंकिता म्हणते, "पहिल्या आठवड्यामधला पहिला टास्क, मी स्वत: बोलले होते येऊन, वाह! अभिजीत सावंतने स्टँड घेतला, आठवतंय?" यावर अरबाज होकार देत म्हणतो, "मी तुला टाळी पण दिली", यावर वैभव ओके म्हणतो. अकिंता पुढे म्हणते की, "याचं कारण तिथे बसलो होतो, मी, निक्की आणि अभिजीत. निक्की अभिजीतला म्हणत होती, तुझं ठिक आहे, माझं ठीक आहे, ही काय आहे आपल्यासोबत, हिचं काय आहे आपल्यासोबत. तेव्हा अभिजीत काहीही बोलत नव्हता".
"तिकडे अटेंशन भेटणार नाही, म्हणून तो इकडे"
अंकिता पुढे सांगते की "जो माणूस दुसऱ्याबद्दल स्टँड घेणारा असतो, तो पहिल्या दिवसापासूवन स्टँड घेतो. त्याच्यानंतर मी त्याला विचारलं तर त्याचं मत असं होतं की, तेव्हा त्याचं फिक्स नव्हतं की, त्याला या ग्रुपमध्ये जायचं की, त्या ग्रुपमध्ये". यावर अरबाज म्हणतो की, "तो का बोलला ते मी सांगतो, तो सेल्फ ऑबसेस्ड आहे, त्याला अटेंशन हवं". अंकिता विचारते, "असं तो बोलला", त्यावर अरबाज आणि वैभव "हो" म्हणतात. अरबाज पुढे सांगतो, "त्याला तिकडे अटेंशन भेटणार. इकडे नाही भेटणार, की मी या ग्रुपचा लीडर". वैभव म्हणाला की, "स्वत: बोलला डायनिंग टेबलवर बसून". अरबाजनंतर सांगतो की, "भाऊही म्हणाले होते बघ, तुम्ही लीडर व्हायला खूप प्रयत्न करताय, पण तुम्हाला ते लोक भाव देत नाहीत, तो प्रयत्न करतो, तुमच्याकडून टीम लीड करायला".
महत्त्वाच्या इतर बातम्या :