Ankita Walawalkar : 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने दिली 'गूड न्यूज', 'सूर जुळले' म्हणत शेअर केला होणाऱ्या नवऱ्याचा फोटो
Ankita Walawalkar Boyfriend : 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने जोडीदाराचा खास फोटो शेअर करत लग्नाची गूड न्यूज दिली आहे.
Ankita Walawalkar Marriage Announcement : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन खूपच गाजला. बिग बॉसमुळे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर हे नाव घराघरात पोहोचलं. अंकिता बिग बॉसच्या घरात असताना पासूनच तिच्या होणाऱ्या जोडीदाराची चर्चा सुरु होती. आता खुद्द अंकिताने तिचा जोडीदार कोण आहे, हे सांगितलं आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकित वालावलकरने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. अंकिताने तिच्या जोडीदारासाठी खास पोस्टही लिहिली आहे.
'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकरने दिली 'गूड न्यूज'
अंकिता वालावलकरचा होणारा नवरा कोण अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. आता या नावावरुन अंकितानेच पडदा हटवला आहे. अंकिता वालावलकरने तिच्या जोडीदारासाठी खास फोटो शेअर करत ते लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. अंकिताने इंस्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत 'सूर जुळले' असं खास कॅप्शनही दिलं आहे.
अंकिताने शेअर केला जोडीदाराचा फोटो
अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडही एक कलाकार आहे. तो इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. अंकिता वालावलकरच्या बॉयफ्रेंडचं नाव कुणाल भगत आहे. कुणाल संगीत दिग्दर्शक आहे. त्याने अनेक गाणी, चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. यामुळे अंकिताने कुणालचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी 'सूर जुळले' हे खास कॅप्शन दिलं आहे.
सूर जुळले
View this post on Instagram
होणाऱ्या नवऱ्यासाठी अंकिताची खास पोस्ट
यासोबतच अंकिताने कुणालसाठी आणखी एका खास पोस्ट शेअर करत लिहिलंय, "प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे, हे तू सांगितलंस, काळाच्या ओघात कळलच नाही, आयुष्य कसं कुठे बदललं, तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन. दसऱ्याच्या शुभेच्छा."
महत्त्वाच्या इतर बातम्या :