Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरामधून मेघा घाडगे बाहेर; स्पर्धकांना म्हणाली, 'सांभाळून राहा'
मेघा घाडगेला घराबाहेर पडावे लागले. "अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं... किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. AV पहिली मी, या माणसापासून सांभाळून राहा" हा घरच्यांना मेघा घाडगेनं सल्ला दिला.
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’ सीझन 4च्या (Bigg Boss Marathi 4) या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. आरोप प्रत्यारोप तर बघायला मिळालेच पण, काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. तर योगेशला सक्त ताकीद मिळाली जर या पुढे कोणाचा बाप काढला तर घरामधून बाहेर काढेन. काही सदस्यांना पत्राद्वारे आपल्या व्यक्त करण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तेजस्विनीने अमृता धोंगडेसाठी तर प्रसादने योगेशसाठी पात्र लिहिले... तर अमृता देशमुखने प्रसादसाठी पत्र लिहिले तर किरण माने यांनी विकासाठी.
बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अपूर्वा अमृता धोंगडे वर चांगलीच भडकली, "आयुष्यात पुन्हा असं बोलीस तर खूप महागात पडेल” असे अपूर्वाने तिला बजावून सांगितले. तर दिवाळीनिमित्त काही स्पेशल भेटवस्तू सदस्यांनी एकमेकांना दिल्या. ज्यामध्ये त्रिशूलने योगेशला नारळ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला, तर अपूर्व मिळाली काडेपेटी. तेजस्विनीला मिळाले रिमोट कंट्रोल.
View this post on Instagram
VOOT आरोपी कोण मध्ये विकासला आरोपी ठरवले आणि शिक्षा देखील सुनावली. कारण देखील दिले का तो या आठवड्याचा आरोपी आहे, कारण किरण माने सांगतात तेच तो करतो. आणि तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे घरातील प्रत्येक सदस्याला वाटत असते. मेघा घाडगेला घराबाहेर पडावे लागले. "अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं... किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. AV पहिली मी, या माणसापासून सांभाळून राहा" घरच्यांना मेघा घाडगेनं सल्ला दिला.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: