Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्पर्धकांनी साजरी केली दिवाळी; तयार केला आकाशकंदील
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये सदस्य मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करताना दिसणार आहेत.
Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सर्व सदस्य दिवाळी साजरी करणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करताना दिसणार आहेत. सदस्यांनी एकत्र मिळून कंदील बनवला आहे तर घराची सजावट देखील केली. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून बिग बॉस मराठीच्या सदस्यांनी तमाम प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तेजस्विनीचा ग्रुप आज दुसऱ्या ग्रुपबद्दल चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये तेजस्विनी तिच्या टीमला सावध करणार आहे. काल मेघा घाडगे यांना घराबाहेर पडावे लागले आणि त्यामुळे घरातील दुसऱ्या ग्रुपची समीकरणं तेजस्विनीला बदलताना दिसत आहेत, ज्याबद्दल ती ग्रुपला सल्ला देणार आहे. विशेषतः योगेशला. तेजस्विनी सांगताना दिसणार आहे, "आता काय झालं आहे काल जे झालं त्यानंतर लगेच सगळे नीट बोलत आहेत. मला काही प्रॉब्लेम नाहीये मी तर तशीही पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी नीटच बोलते आहे इथे माझी लॉयलीटी मी दाखविली आहे. ते नीट बोले तरी भारावून जाऊ नका. फक्त काळजी घ्या, त्यांची Strength कमी होतं आहे तर त्यांना लोकं पण हवी आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये बसायला, टवाळक्या करायला. त्यात तुझा नंबर पहिला आहे (योगेश) emotionally भारावून जाण्यात तू पहिला येतोस. अमृता धोंगडे म्हणाली, त्या दोघांचे (किरण आणि विकास) म्हणणे आहे प्रसादसाठी त्यांनी आपल्याशी वैर घेतले. तेजस्विनीचे म्हणणे आहे या दोघांचे काहीच होणार नाहीये ते तसेच राहणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: