Big Boss Marathi 3 : बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील पहिल्याच आठवड्यात मांजरेकरांनी घेतली स्पर्धकांची शाळा
बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धकांनी धुमाकुळ घातल्याने महेश मांजरेकरांनी घेतली स्पर्धकांची शाळा
Big Boss Marathi 3 : छोट्या पदद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस मराठी मागील आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मस्ती, मज्जा, भांडणतंटे करत महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धांनी प्रचंड उत्साहात बिग बॉसच्या
घरात राडा करत पहिला आठवडा पार केला. सोनाली पाटील, विशाल निकम, स्नेहा वाघ, उत्कर्ष शिंदे, मिरा जगन्नाथ, तृप्ती देसाई, आविष्कार दारव्हेकर, सुरेखा कुडची, विकास पाटील, गायत्री दातार, शिवलीला पाटील, जय दुधाणे, मीनल शाह, अक्षय वाघमारे, संतोष
चौधरी हे कलाकार पहिल्याच आठवड्याच चांगलाच धुमाकुळ घालताना दिसून आले.
बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व पहिल्याच एपिसोडपासून चर्चेत होते. त्यातील काही स्पर्घक प्रेक्षकांना आवडले, काहींचा राग आला तर काही जण सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. पहिल्याच आठवड्यात मीरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघमध्ये जेवणावरून वाद झाला. टास्कमध्ये स्पर्धकांची चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. अशा मजेशीर आठवड्यानंतर विकेण्डच्या डावात महेश मांजरेकरांनी अनेकांची चावडीवर शाळा घेतली.
मीरा जगन्नाथने पहिल्याच दिवशी अतिशय शुल्लक कारणाने घरात भांडणाला सुरुवात केली होती. त्यामुळे महेश मांजरेकरांनी तिला चांगलच सुनावलं. ती कशी चुकीची होती हे सांगत असताना मीराने तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण मांजरेकरांनी "तु आधी
ऐकायला शिक" म्हणत मीराची बोलतीच बंद केली. बिगबॉसच्या घरात काही जणं अजूनही स्वत:च्या डोक्याने खेळत नाहीत. गायत्री दातार मीराच्या मागे कोकरासारखी फिरत असते, मीराच्या
डावपेचात सामिल असते असं मांजरेकर म्हणाले.सोनाली पाटीलने घरात जेवणावरुन चांगलाच राडा घातला. तृप्ती देसाईंची चूक नसताना त्यांना सुनवलं गेल्याने विकेण्डच्या डावात तिचीदेखील मांजरेकरांनी शाळा घेतली.
दादूस बनला सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन
बिग बॉस मराठी 3 मध्ये महेश मांजरेकरांनी दादूस उर्फ संतोष चौधरींच भरभरून कौतुक केले. त्याच्या आगरी कोळी संगीताने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केले आहे. महेश मांजरेकर दादूसला म्हणाले या आठवड्यात दादूस सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन बनला आहे.