एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात रंगत आहेत रंगतदार टास्क

Bigg Boss House Groups : बिग बॉसने घोषित केले आहे, "घरातील फर्निचर पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही"

Bigg Boss Marathi Group C : बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन सुरू होताच घरातील सदस्यांमध्ये दोन गट निर्माण झाले आहे.  काही सदस्य मात्र नक्की कोणाच्या गटात आहेत याचा अंदाज येत नव्हता. पण आता दिवस पुढे जात आहेत तसा अंदाज येऊ लागला आहे. काल बिग बॉस मराठीच्या घरात एक टास्क रंगला. त्यासाठी बिग बॉस यांनी दोन गट घोषित केले आहेत. 

दुसरीकडे स्नेहा, सुरेखा, दादुस, तृप्ती ताई यांचा एक वेगळा स्वतंत्र गट तयार झालेला दिसून येतो आहे. हा गट म्हणजे घरातला C गट. तृप्ती ताई म्हणाल्या C फॉर क्लिअर. A आणि B च्या बाजूने नसलेला गट. तर आज याच गटात चर्चा रंगणार आहे. काल बिग बॉसने "जिंकू किंवा लढू" हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य असेल असे जाहीर केले. पण या टास्कमध्ये अनेक लहानसहान टास्क होणार आहेत. त्यातील पहिला टास्क "माझे मडके भरी" हा होता. परंतु या टास्कदरम्यान अक्षय आणि विशालमध्ये भांडण झाल्याने हा टास्क रद्द करण्यात आला होता. 

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घोषित केले आहे, "घरातील फर्निचर पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही" त्यामुळे घरातील सदस्यांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या आदेशाची घरातील सदस्य मजा घेताना दिसून येत आहेत. तृप्ती ताई म्हणाल्या, "हारे हारे हारे"... त्यावर गायत्री म्हणते,"जे वापरणार बेड" त्यावर तृप्ती ताई म्हणाल्या,"आमची डायरेक्ट पडणार रेड". आता घरातील सदस्य फर्निचर मिळवण्यासाठी काय प्रयत्न करणार? स्पर्धकांना कुठला नवा टास्क बिग बॉस देणार हे आजच्या भागात दिसून येणार आहे. 

स्पर्धकांना बिग बॉस नेहमीच आदेश देत असतात. पण आज जय बिग बॉसला आदेश देताना दिसून येणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात काही गोष्टी सदस्यांना दिल्या जातात. तर काही गोष्टींपासून स्पर्धकांना वंचित राहावे लागत असते. कधी कधी बिग बॉस स्पर्धकांना त्या गोष्टी मिळविण्याची संधीदेखील देत असतात. पण जयने न राहून बिग बॉसलाच ऑर्डर दिली आहे. जय बिग बॉसला म्हणाला, "बिग बॉस माझ्यासाठी एक लोणच्याची बाटली पाठवून द्या, जर तुम्ही आमच्यावर प्रेम करता तर". जय पुढे म्हणाला, "अजून जास्त प्रेम करत असाल तर लस्सी पाठवा".

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांना कोणाला चायनीज खायचं आहे, कोणाला लोणचं, तर कोणाला वेज ट्रिपल शेजवान फ्राइड राईस खायचा आहे, कोणाला चिकन तर कोणाला मंचुरियन तर कोणाला पनीर चिली. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घराचे रुपांतर कदाचीत एक दिवस रेस्टॉरंटमध्ये देखील होऊ शकते.

घरातील सर्व सदस्यांनी काल एकत्र येऊन स्नेहाचा वाढदिवस साजरा केला आहे. तृप्ती देसाई स्नेहाला सगळ्यांच्यावतीने छानसे गिफ्ट देताना दिसून आल्या होत्या. बिग बॉसच्या घरात सणासुदीला तसेच घरातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बॉसतर्फे गोड धोड पदार्थ देण्यात येत असतात. स्नेहाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईने गोड पदार्थ पाठवले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Nikki Tamboli And Arbaz Patel Unfollow: 'आपल्या पार्टनरला धोका...' निक्की तांबोळीनं बॉयफ्रेंडला चीट केलं? अरबाज पटेलची क्रिप्टिक पोस्ट, एकमेकांना केलं अनफॉलो, ब्रेकअप झालं?
'आपल्या पार्टनरला धोका...' निक्की तांबोळीनं बॉयफ्रेंडला चीट केलं? अरबाज पटेलची क्रिप्टिक पोस्ट, एकमेकांना केलं अनफॉलो, ब्रेकअप झालं?
Pooja Birari Soham Bandekar: पूजा-सोहमच्या लग्नाआधी वडिलांनी भावावर सोपवली मोठी जबाबदारी; भेटीनंतर भावाची Reaction काय होती?
पूजा-सोहमच्या लग्नाआधी वडिलांनी भावावर सोपवली मोठी जबाबदारी; भेटीनंतर भावाची Reaction काय होती?
Popular YouTuber Chhavi: उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाताना काळाचा घाला; ट्रक अन् कारची भीषण धडक, फेमस Youtuberसह आईचाही मृत्यू
उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाताना काळाचा घाला; ट्रक अन् कारची भीषण धडक, फेमस Youtuberसह आईचाही मृत्यू
The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती

व्हिडीओ

Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार
Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी
6 चौकार 7 षटकार,26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी, अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी 
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान, 3 कंपन्या फायद्यात
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
Kaas Flower Festival : कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज,मंडपघळसह नवे पॉइंट्स विकसित
कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर
घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
Embed widget