Bigg Boss 15 : बिग बॉसमध्ये होणार 'बबीता जी' आणि 'नागिन'ची एंट्री
Bigg Boss 15 :बिग बॉस 15 (BB 15) मध्ये लवकरच 4 नवीन चॅलेंजर्स प्रवेश करणार आहेत. आता शोमध्ये हे लोक स्पर्धकांचा क्लास घेताना दिसणार आहेत.
Munmun Dutta and Surbhi Chandna Will Enter Bigg Boss 15 : बिग बॉस 15 मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आता हळूहळू शोमध्ये स्पर्धक कमी होत चालले आहेत आणि बाकीच्या लोकांमध्ये कडवी स्पर्धा पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, शोमध्ये इंटरटेंमेंट कायम राहावं म्हणून निर्माते काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यामुळेच काही आठवड्यांपूर्वी निर्मात्यांनी बिग बॉसच्या घरात राखी सावंत, रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी यांची वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री केली होती. त्यानंतर आता या शोने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. शोचा शेवट लवकरच होणार असला तरी कुटुंबातील सदस्यांसाठी हा मार्ग अद्याप सोपा नाही कारण लवकरच चार नवीन चेहरे बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत जे चॅलेंजर म्हणून तिथे पोहोचतील. 'तारक मेहता का उल्टा चष्मा फेम' 'बबिता जी' म्हणजेच मुनमुन दत्ताचे (Munmun Dutta) नाव या यादीत सामील आहे.
सलमान खानने (Salman Khan) वीकेंड का वारमध्येही याकडे लक्ष वेधले असून लवकरच काही लोक घरात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, निर्माते शोमध्ये 4 चॅलेंजर्सना एंट्री घेणार आहेत, ज्यामुळे स्पर्धकांसाठी अडचणी निर्माण होतील. चॅलेंजर्स स्पर्धकांना घरातील कामे करायला लावतील आणि नवीन टास्कही देतील. या 4 जणांची नावेही उघड झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ता, आकांक्षा पुरी (Akanksha Puri), सुरभी चंदना (Surbhi Chandna)आणि विशाल सिंह (Vishal Singh) या शोमध्ये प्रवेश करणार आहेत.
मुनमुन दत्ता खूप छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुरभी चंदना हिची गणना छोट्या पडद्यावरील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. आकांक्षा पुरी पारस छाबरा (Paras Chhabra) बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. कारण त्यावेळी ती पारससोबत रिलेशनशिपमध्ये होती. दुसरीकडे, विशाल सिंहबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 'साथिया' या मालिकेत जिगर मोदीची भूमिका साकारली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या बडा नेत्याकडून वानखेडेंना त्याच पदावर ठेवण्यासाठी लॉबिंग - मलिक
- Luka Chupi 2 : विकी कौशलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, काय आहे प्रकरण?
- Winter Skin Care Tips : हिवाळ्यात ड्राय स्किनपासून अशी मिळवा सुटका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha