एक्स्प्लोर
बिग बॉस 11मधील 'या' स्पर्धकांचं मानधन किती?
रियालिटी शो 'बिग बॉस' यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना बरंच मानधन देण्यात येत असल्याची चर्चा आहे.
मुंबई : रियालिटी शो 'बिग बॉस'च्या 11व्या मोसमात हिना खान, हितेन, शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यासारखे बडे सेलिब्रिटी यामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना बरंच मानधन देण्यात येत असल्याची चर्चा आहे. तर या शोचा होस्ट सलमान खानला याला एका एपिसोडसाठी तब्बल 11 कोटी देण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेतील 'अक्षरा बहू' ही म्हणजेच हिना खान हिला या शोसाठी एका आठवड्याला तब्बल 7 ते 8 लाख रुपये मिळतात.
'सास भी कभी बहू थी' मालिकेतील अभिनेता हितेन याला देखील एका आठवड्यासाठी 7 ते 8 लाख रुपये मानधन देण्यात येतं.
'भाबीजी घर पर है' मालिकेतील 'अंगुरी भाभी' साकारणारी शिल्पा शिंदे देखील या रियालिटी शोमध्ये सहभागी झाली असून तिला आठवड्याला 6 ते 7 लाख रुपये मानधन देण्यात येत आहे.
अॅण्ड टीव्हीतील हेड प्रोड्युसर असणारा विकास गुप्ता याला देखील एका आठवड्यासाठी 6 ते 7 लाख रुपये मानधन देण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement