एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेता राम कपूर विरोधात फसवणुकीचा गुन्हा
अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डाची थकबाकी भरण्यासाठी रामने तातडीने पैसे उसने घेतल्याचं 'मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी'ने म्हटलं आहे.
मुंबई : 'बडे अच्छे लगते है' फेम अभिनेता राम कपूर विरोधात मुंबईतील कोर्टात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 लाखांच्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने रामविरोधात गेल्या महिन्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
कुलाब्यातील 'मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी' या कंपनीकडून रामने ऑगस्ट 2016 मध्ये कर्ज घेतलं होतं. महिन्याभरात 24 टक्के दराने ही रक्कम तो फेडणार होता. मात्र ठरल्याप्रमाणे वर्षभरानंतरही 35 लाखांची रक्कम परत फेडू न शकल्यामुळे राम कपूरविरोधात तक्रार नोंदवण्यात आली.
अप्रामाणिक हेतूने रामने फसवणूक केल्याचा दावा कंपनीने केला आहे. अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्डाची थकबाकी भरण्यासाठी रामने तातडीने पैसे उसने घेतल्याचं 'मावी बिझनेस वेंचर्स एलएलपी'ने म्हटलं आहे.
राम कपूरची भूमिका असलेल्या बडे अच्छे लगते है, घर एक मंदिर, कसम से सारख्या मालिका आणि उडान, हमशकल्स, स्टुडंट ऑफ दि इयर यासारखे चित्रपट गाजले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement