(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amitabh Bachchan: केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना दुखापत, पायाला टाके; चाहत्यांना दिली माहिती
‘कौन बनेगा करोडती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाच्या एका एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी यांना दुखापत झाली आहे.
Amitabh Bachchan: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’ चा (Kaun Banega Crorepati) सध्या 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीझनच्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धक सहभागी होतात. या सीझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करत आहेत. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी यांना दुखापत झाली आहे. त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून याबाबात बिग बींनी एका ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.
डाव्या पायाला झाली दुखापत
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, 'केबीसीचे शूटिंग सुरु असताना पायात बुट घातला होता. त्यामध्ये असणाऱ्या एका धातूच्या तुकड्याने डाव्या पायाची नस कापली गेली, नस कापल्यानंतर रक्त वाहू लागले. काही कर्मचारी आणि डॉक्टरांच्या टीमने रुग्णालयात नेले. ब्लॉगमध्ये पुढे बिग बींनी लिहिलं,'काही टाके पडले असले तरी वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने मी बरा झालो.'
डॉक्टरांनी दिला हा सल्ला
ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलं की, 'पायाला दुखापत झाल्यानं डॉक्टरांनी काही दिवस ट्रेडमिलवर न चालण्याचा सल्ला दिला आहे. तसेच उभे राहू नका आणि हालचाल देखील करु नका, असं त्यांनी सांगितलं आहे.'
View this post on Instagram
बिग बींचा आगमी चित्रपट
केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. अमिताभ यांचा 'ऊंचाई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: