एक्स्प्लोर

अजय-अतुलने हास्यजत्रेच्या मंचावर लावली हजेरी, अतुल साकारणार विनोदी भूमिका

'मराराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून आज आज अजय-अतुलची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा ठरतो आहे. आज याच हास्यजत्रेच्या मंचावर 'अजय-अतुल' ही जोडी येणार आहे. अजय-अतुल या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीतानी वेड लावले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घराघरांत अगदी आवडीने पाहिला जातो. 'इंडियन आयडल मराठी' कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी अजय-अतुलच्या जोडीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर हजेरी लावली आहे. 

इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सोनी मराठीवर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान अतुल गोगावले हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण करताना दिसणार आहेत. अजयसाठी हे सरप्राईज असणार आहे. अतुलला सादरीकरण करताना पाहून अजयला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. "आपल्याला हसवणाऱ्या आणि आपलं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावं,असा विचार करत अतुलने स्कीटचं सादरीकरण केलं आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. याआधी स्वानंदी सोनी मराठी वाहिनीवरीलच 'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची विजेती ठरली होती. 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी सुरांची पर्वणी असणार आहे. पुण्यातील नारायण पेठेत भित्तीचित्राद्वारे 'अजय-अतुल' परीक्षण करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 

'अजय-अतुल' या जोडीने आतापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. त्याचप्रमाणे 'इंडियन आयडल' या मंचाने देखील संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. आता हा मंच मराठीतदेखील आल्याने मराठी सिनेविश्वाला देखील अनेक गुणी कलाकार मिळतील अशी आशा आहे. फ्रीमेन्टल या निर्मितीसंस्थेने 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Shivani Naik on Irregular Periods: 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीला PCOSचा त्रास; पिंपल्समुळे हैराण, म्हणाली 'मला 6-6 महिने पीरियड्स येत नव्हते'
Tejashree Pradhan on Nivedita Ashok Saraf: 'हीच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
'हीच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
TV Actor Death: 'पहाटे अलार्म वाजला, आई उठवायला गेली, पण तो उठलाच नाही'; प्रसिद्ध TV अभिनेत्याचं निधन, झोपेतच झटका आला
'पहाटे अलार्म वाजला, आई उठवायला गेली, पण तो उठलाच नाही'; प्रसिद्ध TV अभिनेत्याचं निधन, झोपेतच झटका आला
Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget