Aishwarya Sharma:ऐश्वर्या शर्मानं का सोडली ‘गुम है किसी के प्यार में’ मालिका; 'हे' आहे कारण
अभिनेत्री ऐश्वर्या शर्मानं (Aishwarya Sharma) ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही मालिका सोडली आहे.
Aishwarya Sharma GHKKPM Quit Reason: ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या कार्यक्रमामधील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत सई, पाखी आणि विराटची कथा दाखवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी, सत्याची एंट्री कथेत झाली. पण आता या मालिकेतील पाखी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) उर्फ पत्रलेखा ही शो सोडला आहे. ऐश्वर्या शर्मानं ही मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला? हे जाणून घेऊयात...
पाखी म्हणजेच ऐश्वर्याने ‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका सोडली आहे. त्यामुळे चाहते नाराज आहेत. पाखीने शो सोडण्याचा निर्णय का घेतला? हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. ती प्रेग्नंट असल्यानं शो सोडत आहे, असं अनेकांचे मत आहे. मात्र, एका रिपोर्टनुसार, शोमधील पाखी या भूमिकेचा ट्रॅक संपला आहे. रिपोर्टनुसार, ऐश्वर्या शर्माने शो सोडला कारण तिचा ट्रॅक संपणार होता. आता या मालिकेची कथा सई (आयशा सिंग), विराट (नील भट्ट) आणि सत्या (हर्षद अरोरा) यांच्यावर आधारित असणार आहे.
ऐश्वर्या शर्माने एका मुलाखतीमध्ये ‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका सोडण्याबाबत सांगितलं होतं. आता मी नवीन संधीच्या शोधातआहे, असंही तिनं संगितलं. ऐश्वर्याला नव्या शोमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
मालिकेमधील विराट ही भूमिका साकारणाऱ्या नील भट्टसोबत ऐश्वर्या शर्मानं 2021 मध्ये लग्न केलं आहे. दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. ऐश्वर्या शर्माला 1.6 मिलियन फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या: