Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकरचं लग्नाआधीचं नाव माहितीये? या सुखांनो या ते स्वामिनी, अभिनेत्रीच्या 'या' मालिकांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
ऐश्वर्या नारकरचं लग्नाआधीचं नाव काय होतं? ऐश्वर्यानं कोणकोणत्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे? याबाबत जाणून घेऊयात...
Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. ऐश्वर्या नारकर ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आहे. ऐश्वर्या आणि अविनाश या कपलच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. लग्नापूर्वी ऐश्वर्याचं नाव काय होतं? ऐश्वर्यानं कोणकोणत्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे? याबाबत जाणून घेऊयात
ऐश्वर्या नारकरचं लग्नापूर्वी पल्लवी अठले असं नाव होतं. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्यानं तिच्या कुटुंबाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, 'मी अभिनयक्षेत्रात येण्याचा विचार केला नव्हता. माझं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. बाबा बँकेत नोकरीला होते. चाळीत राहणारी आमची फॅमिली होती. मला आभ्यास करायला खूप आवडायचं. मला सायन्स साइडमध्ये काही तरी करायचं होतं.'
ऐश्वर्या नारकरनं 'या' मालिकांमध्ये केलं काम
ऐश्वर्यानं अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ये प्यार ना होगा काम,घर की लक्ष्मी बेटियां या हिंदी मालिकांमध्ये तिनं काम केलं.
ऐश्वर्या ही नाटकांमधून आणि चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येते. गंध निशिगंधाचा, सोयरे सकळ,सोनपंखी या नाटकांमध्ये ऐश्वर्यानं काम केलं. तसेच तुच माझी भाग्य लक्ष्मी,कधी आचानक, अंक गणित आनंदाचे या मराठी चित्रपटांमधून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली.
View this post on Instagram
ऐश्वर्या ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिला इन्स्टाग्रामवर 132k फॉलोवर्स आहेत. ऐश्वर्या ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. ऐश्वर्या ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. अनेक वेळा ती वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची दमदार ओपनिंग; तीन दिवसांत केली सात कोटींपेक्षा अधिक कमाई