एक्स्प्लोर

अग्निहोत्र 2 मालिका गाशा गुंडाळणार!

गेल्या अनेक दिवसांपासून अग्निहोत्र बंद होणार असल्याची चर्चा टीव्ही वर्तुळात होती. पण आता स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेचे प्रोमो आणि वेळ पाहता अग्नहोत्र येत्या काही दिवसांत गाशा गुंडाळणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या मालिकेच्या जागी आता वैजू नंबर १ ही मालिका मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून येते आहे.

मुंबई : स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र 2 ही मालिका लवकरच गाशा गुंडाळणार असल्याची माहिती आहे. स्टार प्रवाहवर गेल्या दोन महिन्यांपासून अग्निहोत्र 2 ही मालिका सुरु झाली. अग्निहोत्र या मालिकेची लोकप्रियता कॅश करण्यासाठी चॅनलने ही नवी गोष्ट छोट्या पडद्यावर आणली. 2 डिसेंबरपासून ही मालिका सुरु झाली. मालिकेच्या टीजरला कमाल प्रतिसाद मिळाला, शरद पोंक्षे, रश्मी अनपट, राजन भिसे आदी कलाकारांचा चोख अभिनय ही या मालिकेची जमेची बाजू होतीच. पण मालिका सुरु होऊन अवघे दोन महिने उलटत नाहीत तोच चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. आजही अग्निहोत्र मालिकेविषयी आणि मालिकेतल्या पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये जिव्हाळा आहे. पहिल्या पर्वातलं अग्निहोत्री कुटुंब आणि आठ गणपतींच्या रहस्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 'अग्निहोत्र 2' मध्ये नव्या पीढीची नवी गोष्ट आणि सप्तमातृकांचं रहस्य उलगडणार होतं. या सप्तमातृकांच्या रुपात सात अभिनेत्री दिसणार होत्या. या सात अभिनेत्रींपैकी एक अक्षरा म्हणजेच रश्मी अनपट होती. पहिल्या पर्वात महादेव अग्निहोत्रींची भूमिका अभिनेते शरद पोंक्षे यांनी साकारली होती. आजारावर मात करत 'अग्निहोत्र 2' मध्येही शरद पोंक्षे त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज होते. अग्निहोत्र 1 चे दिग्दर्शन अभिनेते-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केलं होतं. 'अग्निहोत्र 2'ची कथा श्रीरंग गोडबोले यांची होती तर भीमराव मुडे या मालिकेचं दिग्दर्शन करत होते. अग्निहोत्रचा प्रवास नव्याने सुरु होणार, 'अग्निहोत्र 2'चा टीझर रिलीज सध्या या मालिकेचं शूटिंग मुंबईजवळ सुरु आहे. अजून याचं शूट थांबलेलं नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार ही मालिका गुंडाळली जात असल्याची कल्पना मालिकेच्या कलाकारांनाही देण्यात आली आहे. येत्या काळात या मालिकेच्या जागी 'वैजू नंबर 1' ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेची गोष्टच संपल्यामुळे ही मालिका बंद करत असल्याचं कारण पुढे केलं जात आहे. पण कोणतीही मालिका अशी दोन महिन्यांत बंद होत नाही. अचानक हा निर्णय झाल्याने मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मालिकेचा एकूण खर्च आणि टीआरपीचं गणित न जमल्यामुळे चॅनलला जवळपास 50 लाखांचं नुकसान सोसावं लागल्याचं कळतं. अर्थात हा अधिकृत आकडा नाही. चॅनलकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण टीव्ही वर्तुळात मात्र अग्निहोत्र 2 बंद होत असल्याच्या चर्चेने अनेकांना हुरहूर लागली आहे. पण एव्हाना 'वैजू नंबर 1'चे प्रोमो टीव्हीवर दिसूही लागले आहेत. त्यांची वेळ पाहता अग्निहोत्र लवकरच बंद होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. स्टार प्रवाहच्या फेसबुक पेजनुसार 9 मार्चपासून ही मालिका रात्री 10 वाजता दाखवली जाणार आहे. त्यामुळे अग्निहोत्री कुटुंबीय आणखी जेमतेम 10-12 दिवस प्रत्येक घरात साथीला असणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget