एक्स्प्लोर

अग्निहोत्रचा प्रवास नव्याने सुरु होणार, 'अग्निहोत्र 2'चा टीझर रिलीज

दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे 'अग्निहोत्र' मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 'अग्निहोत्र 2' मध्ये कोणते कलाकार असतील याचीही उत्सुकता वाढली आहे.

मुंबई : तब्बल दहा वर्षांनंतर 'अग्निहोत्र 2' ही लोकप्रिय मालिका नव्या कथेसह स्टार प्रवाहवर सुरु होत आहे. अग्निहोत्रच्या पहिल्या पर्वात तीन पिढ्यांना जोडणारं सूत्र प्रेक्षकांना अनुभवता आलं. 'अग्निहोत्र 2' मध्ये नेमकी कोणती गोष्ट उलगडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्गज कलाकार, उत्तम कथेची गुंफण आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन अश्या गोष्टी जुळून आल्यामुळे 'अग्निहोत्र' मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 'अग्निहोत्र 2' साठीही जोरदार तयारी सुरु झाली आहे. 'अग्निहोत्र 2' मध्ये कोणते कलाकार असतील याचीही उत्सुकता वाढली आहे. 'अग्निहोत्र 2' विषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, "दहा वर्षांचा काळ उलटला तरी आजही अग्निहोत्रच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. एखाद्या मालिकेचा इतका प्रभाव असणं हे भारावून टाकणारं आहे. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आहे. जुन्या मालिकेचा आशय आणि मांडणी हे प्रत्येकानेच पाहिले असल्याने तो दर्जा टिकवणं हे आमच्यासाठीही आव्हान आहे. परंतु अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शनाची जोड देऊन एक चांगली कलाकृती मराठी रसिकांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न असेल." 'अग्निहोत्र' मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोले यांची असून भीमराव मुंडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेविषयी सांगताना कथाकार श्रीरंग गोडबोले म्हणाले की, "कुटुंबापासून दूर गेलेली माणसे जेव्हा आपल्याच भूतकाळातील पाळामुळांचा शोध घेत जातात तेव्हा निश्चितच एक गूढ जन्माला येतं आणि तेच गूढ याही मालिकेचा आत्मा आहे. आजवर केलेल्या मालिकांपैकी अग्निहोत्र ही मालिका खूपच जवळची आहे. फक्त माझ्यासाठीच नव्हे तर या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारासाठी ती तितकीच महत्त्वाची आहे." 'अग्निहोत्र 2'चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आणि या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे 'अग्निहोत्र 2' ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari and Usha Nadkarni Serial: आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
आदेश बांदेकरांच्या सूनबाईचा छोट्या पडद्यावर जलवा; उषा नाडकर्णींसोबत नव्या मालिकेत झळकणार, पूजा बिरारीच्या मालिकेचं नाव काय?
Actress Maera Mishra Welcome Baby Girl: 'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
Tarini Fame Actress Ashwini Gorle On Bold Paithani Dress: मराठी अभिनेत्रीनं घातला पैठणीचा बोल्ड ड्रेस, फोटो व्हायरल होताच तुफान ट्रोलिंग; स्वतःची बाजू मांडताना म्हणाली, 'पैठणीचा अपमान...'
मराठी अभिनेत्रीनं घातला पैठणीचा बोल्ड ड्रेस, फोटो व्हायरल होताच तुफान ट्रोलिंग; स्वतःची बाजू मांडताना म्हणाली, 'पैठणीचा अपमान...'
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
Embed widget