Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री, ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘आमदार बाईं’ची भूमिका!
Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ मालिका इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांच्या एन्ट्रीनंतर अतिशय रंजक वळणावर आली आहे.
Devmanus 2 : ‘देवमाणूस’ या मालिकेने पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वाला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. ‘देवमाणूस 2’ (Devmanus 2) मालिका इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांच्या एन्ट्रीनंतर अतिशय रंजक वळणावर आली आहे. अभिनेते मिलिंद शिंदे या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने मिलिंद शिंदे यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. पण, आता ‘देवमाणूस 2’ या मालिकेत क्षणाक्षणाला प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का मिळतोय.
अशातच मालिकेत अजून एक ओळखीचा चेहरा, एक महत्त्वाची भूमिका निभावताना दिसतोय. मालिकेत ‘आमदार बाईं’ची भूमिका साकारणारा चेहरा प्रेक्षकांच्या ओळखीचा आहे. ‘आमदार बाई’ ही भूमिका अभिनेत्री तेजस्विनी लोणारी साकारते आहे.
अजित-डिम्पल मिळून रचणार डाव!
‘आमदार बाईं’सोबत डील करण्यासाठी अजित आणि डिम्पल जातात. पण, तिचा रुबाब आणि वागणं पाहून दोघेही धास्तावतात. आमदार बाई या खूप डेंजर आहेत, असं डिम्पल अजितला सांगते. यानंतर दोघे मिळून पुन्हा नवा प्लॅन रचण्यास सुरुवात करतात. अजित कुमार देव अर्थात देवमाणसाने आता डिम्पलशी लग्न करून संसार थाटला आहे. आता ते दोघे मिळून लोकांना लुबाडण्याचा प्लॅन करत आहेत.
पहिल्यांदाच मराठी मालिकेत झळकतेय अभिनेत्री!
या आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी म्हणाली की, ‘देवमाणूस 2मध्ये मी आमदार देवयानी गायकवाड ही भूमिका निभावतेय. देवयानी हे एक अतिशय स्ट्राँग व्यक्तिमत्व आहे आणि ती तिचं काम करत असताना तिच्या वाकड्यात जर कोणी शिरलं, तर ती त्या व्यक्तीला सोडत नाही, हे ती वारंवार दाखवून देते. त्यामुळे गावात तिचा दबदबा आहे. राणी पद्मिनी या मालिकेनंतर मी अनेक चित्रपट केले आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. त्यानंतर ‘देवमाणूस 2’ ही माझी पहिलीच मराठी मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत काम करण्याच्या अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. माझे सगळे सहकलाकार खूपच पॉझिटिव्ह आहेत. सगळ्यांसोबत अजून माझे सीन्स झाले नाहीत. पण, सीन्सच्या आधी मला रिहर्सलमध्ये सगळे खूप मदत करतात. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. एकंदरीतच शूटिंग करताना खूप धमाल येते.’
हेही वाचा :
- Superhit Bollywood Stars : दीपिका पदुकोण ते शाहरुख खान, ‘या’ कलाकारांना पहिल्याच चित्रपटाने रातोरात बनवले स्टार!
- Chhavi Mittal Post : कॅन्सरच्या ऑपरेशननंतर पहिल्यांदाच छवी जिममध्ये, फोटो शेअर करत म्हणाली...
- Dharmaveer : सोशल मीडियावरही दिसतेय ‘धर्मवीर’ची क्रेझ! अवघ्या 24 तासांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज!