एक्स्प्लोर
अभिनेत्री सुरभी हांडेचा साखरपुडा
सुरभी सध्या कलर्स मराठीवरील 'लक्ष्मी सदैव मंगलम्' या मालिकेत काम करत आहे. तिच्यासोबत ओमप्रकाश शिंदे आणि समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत आहेत.

जळगाव : 'जय मल्हार' या पौराणिक मालिकेत म्हाळसाच्या भूमिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडेचा साखरपुडा झाला आहे. जळगावमध्ये रविवारी (26 ऑगस्ट) दुर्गेश कुलकर्णीसोबत तिचा साखरपुडा पार पडला.
साखरपुड्याबाबत एबीपी माझाशी बोलताना सुरभी म्हणाली की, "आम्हा दोघांची आधीपासूनच मैत्री होती. मात्र आमची क्षेत्रं वेगवेगळी आहेत. अनेक विषयांसह आपापल्या क्षेत्राबद्दल आमच्या गप्पा व्हायच्या. त्यामुळे आमचा बॉण्ड आधीपासूनच होता. यानंतर आम्ही घरच्यांना आमच्या नात्याबद्दल सांगितलं. घरच्यांच्या संमतीनंतर साखरपुड्याची तारीख ठरली आणि आमचा साखरपुडा झाला."
दरम्यान, सुरभीचा साखरपुडा झटपट झाला असला तरी लग्नाला अजून अवकाश आहे. सुरभी पुढच्या वर्षी विवाहबद्ध होणार आहे. तसंच लग्नानंतरही मी मालिकांमधून प्रेक्षकांना भेटत राहिन, असंही तिने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
सुरभीच्या साखरपुड्याचे फोटो फेसबुकवर शेअर झाल्यानंतर चाहत्यांनी तिच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सुरभी सध्या कलर्स मराठीवरील 'लक्ष्मी सदैव मंगलम्' या मालिकेत काम करत आहे. तिच्यासोबत ओमप्रकाश शिंदे आणि समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
