Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; फोटो व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांनी आता लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.
Maharashtrachi Hasya Jatra : मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकदेखील दर्शनासाठी जात आहेत. मुंबईतील लालबागच्या राजावर अनेकांची श्रद्धा आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी पुन्हा एकदा राजाचं दर्शन भाविकांना घेता येणार असल्यानं सगळ्यांमध्ये उत्साह आहे. आता हास्यजत्रेतील (Maharashtrachi Hasya Jatra) दमदार विनोदवीरांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आठवड्यातले चार दिवस हास्यरसिकांना पाहायला मिळत असून काही दिवसांची क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जत्रेकरी आता रसिकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाने खरोखरच रसिकांच्या मनात घर केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेला हा कार्यक्रम असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत.
View this post on Instagram
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं. निवेदिका प्राजक्ता माळी, हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं दर्जेदार परीक्षण तर समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय आजही खुर्चीत खिळवून ठेवण्यास प्रेक्षकांना भाग पाडत आहेत.
हास्यजत्रा ब्रेक घेतेय हे समजल्यावर रसिकांनी हळहळ व्यक्त केली. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम खरोखच रसिकांच्या घराघरांत पोचला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मंचाने रसिकांना निखळ आनंद दिला आहे. हास्यजत्रेतील एकेक पात्र रसिकांना त्यांच्या घरातलं वाटतं.
संबंधित बातम्या
Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' परत येतेय; 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेला मिळाला 'भीमरत्न पुरस्कार 2022'