एक्स्प्लोर

Tandav Row | अॅमेझॉन प्राईमच्या कंटेंट हेडला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; अटक नाही, मात्र तपासात सहकार्य करण्याचे आदेश

अॅमेझॉन प्राईमवर दाखवण्यात आलेली वेब सीरिज 'तांडव'बाबत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अपर्णा पुरोहित यांनी लखनौमध्ये दाखल झालेल्या एफआयआरमध्ये अलाहाबाद हायकोर्टात अटक टाळण्यासाठी मागणी केली होती. परंतु, हायकोर्टानं अपर्णा यांची याचिका फेटाळली होती.

नवी दिल्ली : तांडव वेब सीरिजमुळे सुरु असेल्या विवाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या दरम्यान, अॅमेझॉन प्राईम कंटेंड हेड अपर्णा पुरोहित यांच्या याचिकेवर उत्तर प्रदेश सरकारला नोटीस जारी करण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाने तांडवसाठी लखनौमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासात अपर्णा यांना सहकार्य करण्यास सांगितलं आहे. त्याचसोबत अपर्णा पुरोहित यांना सुप्रीम कोर्टानं दिलासाही दिला असून सध्या त्यांची अटक टळली आहे.

दरम्यान, अॅमेझॉन प्राईमवर दाखवण्यात आलेली वेब सीरिज 'तांडव'बाबत देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अपर्णा पुरोहित यांनी लखनौमध्ये दाखल झालेल्या एफआयआरमध्ये अलाहाबाद हायकोर्टात अटक टाळण्यासाठी मागणी केली होती. परंतु, हायकोर्टानं अपर्णा यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे त्यांना तांडव वेब सीरिजमुळे सुरु असेल्या विवादा प्रकरणी अटक होण्याची शक्यता होती. त्यानंतर मात्र अपर्णा यांनी सुप्रीम कोर्टात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. अखेर सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा दिला आहे.

OTT वर सुप्रीम कोर्ट म्हणालं...

याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टानं OTT प्लेटफॉर्मच्या कटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांवरही भाष्य केलं आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की, योग्य कायदा समंत केल्याशिवाय यावर नियंत्रण ठेवता येणं अशक्य आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सरकार 2 आठवड्यांमध्ये कायद्याचा आराखडा सुप्रीम कोर्टात सादर करणार आहे.

काय आहे आरोप?

उत्तर प्रदेशात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये तांडव वेब सीरिजमध्ये भगवान शंकर आणि हिंदू धर्मासंदर्भात आक्षेपार्ह्य दृश्य आणि संवाद दाखवण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचसोबत राज्याच्या पोलीस यंत्रणेचंही चुकीचं चित्रण आणि जातींच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. अलाहाबाद हायकोर्टानं याप्रकरणी बोलताना सांगितलं होतं की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर धार्मिक भावना दुखावण्याची संमंती कोणालाच नाही. संविधानात सर्व धर्मांचा सन्मान करण्यात आला आहे. या सीरीजमध्ये समाजात जातीच्या आधारावरही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget