Harish Kalyan Wedding : शाही थाट, शोभून दिसतोय जोडा खास; साऊथ सुपरस्टार अडकला लग्नाच्या बेडीत
Harish Kalyan : दाक्षिणात्य अभिनेता हरिश कल्याण विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर आले आहेत.
Harish Kalyan First Wedding Photo : दाक्षिणात्य ( Tollywood ) चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ( South Actor ) अभिनेता हरिश कल्याणने ( Harish Kalyan ) लग्नगाठ बांधली आहे. 'काधली' चित्रपट फेम ( Kaadhali Movie ) अभिनेता हरीश कल्याण नुकताच नर्मदा उदयकुमार ( Narmada Udayakumar ) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे. या दोघांनी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवारासमोर पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे. हरिश आणि नर्मदाच्या लग्नाने सुंदर फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता हरिश कल्याण आणि नर्मदा पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक कपड्यामध्ये फारच सुंदर दिसत आहेत. या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे.
हरीश कल्याणच्या लग्नाचे फोटो व्हायरल
लग्नाच्या एक दिवस आधी हरीश कल्याणने एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या लग्नाबाबतची माहिती दिली. चाहत्यांना वाटले की हरिशचं लव्ह मॅरेज ( Love Marraige ) आहे, पण त्याचं अरेंज मॅरेज ( Arrange Marraige ) असल्याचे हरीशने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मी नर्मदा उदयकुमार सोबत लग्नगाठ बांधणार आहे, आमचं अरेंज मॅरेज आहे, असं हरिशने सांगितलं. आम्ही एकमेकांना पसंत केलं, एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटलो आणि आमचा एकत्र प्रवास सुरू झाला. असा जीवनसाथी मिळाल्याचा मला आनंद आहे, असंही हरीशने माध्यमांना सांगितलं.
कोण आहे हरीश कल्याण?
अभिनेता हरिश कल्याण हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. हरिशने तामिळ आणि तेलगू भाषेमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हरिशने 2010 साली 'सिंधू समवेली' चित्रपटातन अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला खरी ओळख 2017 साली आलेल्या 'काधली' चित्रपटातून मिळाली. हरिश कल्याण आगामी 'डिझेल' चित्रपटात झळकणार आहे.
View this post on Instagram
हरीश कल्याणची पत्नी नर्मदा उदयकुमार कोण?
हरीश कल्याणची पत्नी नर्मदा उदयकुमार चेन्नईची राहणारी आहे. नर्मदा एक उद्योजक ( entrepreneur ) आहे. नर्मदा थिसिसर कंपनीची ( Thrissur Company ) प्रमुख आहेत. दसऱ्याच्या दिवशी हरिशने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून नर्मदासोबतचा फोटो शेअर करत लग्न करत असल्याची बातमी दिली होती.