(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swathi Sathish Surgery : सर्जरी करणं पडलं महागात; कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा चेहरा बिघडला
Swathi Sathish Surgery : स्वातीचे सर्जरीनंतरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Swathi Sathish Surgery : कलाकार हे त्यांच्या चेहऱ्याची काळजी घेतल असतात. कलाकार हे प्लास्टिक सर्जरी करण्याआधी किंवा कोणतीही सर्जरी करण्याआधी अनेकदा विचार करतात. अनेक वेळा प्लास्टिक सर्जरी केल्यानं सेलिब्रिटींचा चेहरा बिघडतो. नुकताच कन्नड अभिनेत्री स्वाती सतीशचा (Swathi Sathish) चेहरा रूट कॅनलमुळे बिघडला आहे. चुकीच्या सर्जरी ट्रीटमेंटमुळे स्वातीचा चेहरा बिघडला आहे. स्वातीचे सर्जरी केल्यानंतरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्वातीच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्याला सूज आलेली दिसत आहे. रिपोर्टनुसार, स्वातीनं बंगळुरुमध्ये रूट कॅनल सर्जरी केली. त्यानंतर तिच्या चेहऱ्याला सूज आली आणि नंतर तिचा चेहरा बिघडला. जेव्हा स्वातीनं डॉक्टरांना याबद्दल सांगितलं तेव्हा डॉक्टरांनी तिला आश्वासन दिलं की, हे सर्व दोन ते तीन दिवसांमध्ये ठिक होईल आणि सूज देखील कमी होईल. पण सर्जरी केल्यानंतर तीन आठवड्यानंतर देखील चेहरा ठिक झाला नाही.
स्वातीनं घराबाहेर पडणं बंद केलं
सर्जरीनंतर चेहरा बिघडल्यानं स्वातीनं घराबाहेर पडणं बंद केलं. डॉक्टरांमुळे तिचा चेहरा खराब झाला असल्याचं स्वातीनं सांगितलं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी भूल देण्याऐवजी सॅलिसिलिक अॅसिड दिलं , असा दावा स्वातीनं केला. '6 To 6' , FIR या मालिकांमध्ये स्वातीनं काम केलं आहे. सध्या स्वातीची ट्रीटमेंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुरु आहे.
गेल्या महिन्यात प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर कन्नड अभिनेत्री चेतना राजचं निधन झालं होतं. तिच्यावर 'फॅट फ्री' शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला शरीरामध्ये काही बदल जाणवले. फुफ्फुसात पाणी शिरल्यानं संध्याकाळी तिची तब्येत खालावली. तिला श्वास घेण्यात देखील त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे आता रुग्णालयातील शस्त्रक्रिया करण्याच्या पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा:
- Shabaash Mithu Trailer : ‘शाबास मिथू’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; क्रिकेटच्या मैदानात तापसी लगावणार चौकार, षटकार
- Daagdi Chaawl 2 : 'चुकीला माफी नाही'; 'दगडी चाळ 2' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
- Dalip Tahil : दलीप ताहिल म्हणाले, 'वय 31, लग्नही झालं नव्हतं अन् साकारली आमिरच्या वडिलांची भूमिका'