Swara Bhaskar Inspiration: शाहरुख माझ्याशी 10-15 मिनटं बोलला अन् माझं डोकं हटलं; स्वरा भास्करनं सांगितला 'तो' जुना किस्सा
Swara Bhaskar Inspiration: स्वरा भास्करनं 'पती पत्नी और पंगा' या रिअॅलिटी शोमध्ये शाहरुख खानबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला. तिनं सांगितलं की, जेव्हा ती त्याच्याशी बोलायची तेव्हा ती वेडी व्हायची बाकी होती.

Swara Bhaskar inspiration: फहाद अहमदशी लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं स्वतःला सिनेसृष्टीपासून काहीसं दूर केल्याचं पाहायला मिळालं. सध्या ती तिच्या दोन वर्षांच्या मुलीच्या पॅरेंटिंगवर लक्ष केंद्रीत करत आहे.
अभिनेत्रीनं अलिकडेच तिच्या मुलीच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर काही दिवसांतच आता हे जोडपं टीव्ही रिअॅलिटी शो 'पती पत्नी और पंगा'मध्ये दिसलं, जिथे अभिनेत्रीनं शाहरुख खानबद्दल एक मोठा खुलासा केला.
स्वरा शाहरुख खानबद्दल म्हणाली की...
कलर्स टीव्हीनं 'पती पत्नी और पंगा' शोचा एक नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद गरबा लूकमध्ये दिसून आले. सर्व स्पर्धकांना विचारण्यात आलं की, आपल्यात अशी एक व्यक्ती उपस्थित आहे, जिनं शाहरुख खानला चिडवलं. सुरुवातीला प्रेक्षकांना संशय हिना खानवर येतो, पन नंतर स्वरानं स्वतःच खुलासा केला की, हे कृत्य तिनं केलं आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री संपूर्ण किस्सा शेयर करते आणि म्हणते की, "माझं त्याच्याशी असलेलं नातं असं आहे की, जेव्हा जेव्हा तो माझ्यासमोर येतो, तेव्हा मी वेडी व्हायची बाकी असायचे. ते माझं नशीब होतं, ते 2017-18 साल होतं, त्यावेळी 'झिरो' चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, म्हणून एक दिवशी शाहरुख खान माझ्याशी 10-15 मिनिटं बोलला, माझं डोकं थाऱ्यावर नव्हतं, माझं डोकं हटलेलं आणि मला काय करावं हेच समजत नव्हतं."
स्वरा पुढे बोलताना म्हणाली की, "मी त्याला सोडतच नव्हते, त्याला खूपच त्रास देत होते, मी त्याला त्याच्याच वडिलांबाबत सांगत होते, त्याचे वडील कसे महान होते, फाळणीनंतर ते भारतात आले... वैगरे वैगरे, शाहरुख बिचारा अच्छा... अच्छा... म्हणून सगळं शांतपणे ऐकत होता." स्वराचा किस्सा ऐकून सगळेच हसू लागले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























