'युद्ध म्हणजे Propaganda', अभिनेत्री स्वरा भास्करने शेअर केला जॉर्ज ओरवेलचा कोट, म्हणाली,..'मूर्खपणाचा अंत..'
Swara Bhaskar shared quote : अभिनेत्री स्वरा भास्करने जॉर्ज ओरवेलचा कोट शेअर करत युद्धावर भाष्य केलंय.

Swara Bhaskar shared quote : काश्मीरमधील पहलगाम (Pahelgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर 22 एप्रिल रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, भारतीय पर्यटकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सरकारने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरु केलं आणि पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारत पाक दरम्यान, तणावाची परिस्थिती असताना अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालीये. स्वरा भास्करने जॉर्ज ओरवेलचा कोट शेअर करत युद्ध म्हणजे Propaganda असल्याचं म्हटलं आहे.
स्वरा भास्करची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
भारत आणि पाकिस्तान दरम्यान, तणावाची स्थिती असताना स्वरा भास्करने इन्स्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये लिहिलंय की, प्रत्येक युद्ध हे प्रपोगंदा असते. किंकाळ्या, द्वेष, खोटेपणा या सर्व गोष्टी लढणाऱ्या लोकांकडून येते. हा जॉर्ज ऑरवेलचा कोट स्वरा भास्करने शेअर केलाय.
एकदा तुमच्या कुटुंबातील लोकांकडे पाहा आणि विचार करा, स्वरा भास्करचं आवाहन
दरम्यान, याशिवाय स्वरा भास्करने आणखी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिलंय की, ज्यांना युद्ध व्हावं असं वाटतं त्या सर्वांसाठी माझ्याकडे निवेदन आहे. तुम्ही एकदा तुमच्या कुटुंबातील लोकांकडे पाहा आणि विचार करा. तुम्ही त्यांना गमावण्यासाठी तयार आहात का? कारण युद्ध केवळ सीमेवर लढले जाणार नाही. ते तुमच्या घरापर्यंत देखील येईल. दरम्यान, स्वरा भास्करने हैद्राबादमधील कराची बेकरीवर तिरंगा फडकवण्यात आलेला फोटो शेअर करत लिहिलंय की, हा मूर्खपणा कधी थांबेल? या पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. दरम्यान, या पोस्टमुळे स्वरा भास्करला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.
दरम्यान, भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सैन्याचं कौतुक केलं आहे. सोफिया अन्सारीबाबत बॉलिवूड कलाकरांनी भरभरुन लिहिलं आहे. याशिवाय दोन्ही महिला अधिकाऱ्यांचं बॉलिवूड कलाकरांनी कौतुक केलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या























