Thriller Movies On OTT: थ्रीलर फिल्म्स पाहण्याचे शौकीन असाल तर, फटाफट पाहा OTT वरच्या 'या' 5 फिल्म; सस्पेन्स एवढा की, डोक चक्रावून जाईल...
Thriller Movies On OTT: यंदाचं वर्ष थिएटरमध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक सर्वोत्कृष्ट सिनेमांनी गाजवलं. ज्यात कॉमेडी, हॉरर, अॅक्शन आणि थ्रिलर अशा विविध जॉनरच्या सिनेमांचा समावेश आहे.

Thriller Movies On OTT: 2025 वर्ष आता जवळपास संपत आलंय. यंदाचं वर्ष थिएटरमध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक सर्वोत्कृष्ट सिनेमांनी गाजवलं. ज्यात कॉमेडी, हॉरर, अॅक्शन आणि थ्रिलर (Action And Thrill) अशा विविध जॉनरच्या सिनेमांचा समावेश आहे. जर तुम्ही सिनेप्रेमी असाल आणि थ्रिलर सिनेमे (Thriller Movies) पाहायला आवडत असेल, तर आम्ही तुम्हाला या वर्षीच्या पाच सर्वोत्तम सस्पेन्स, थ्रीलर सिनेमांबाबत सांगणार आहोत. हे सिनेमे तुम्हाला मनोरंजनाचा पूर्ण डोस देतील. याशिवाय, या सिनेमांमधला सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत तुमची पापणीही पडू देणार नाही.

रेखाचित्रम (Rekhachithram)
जोफिन टी. चाको (Jofin T. Chacko) दिग्दर्शित आणि आसिफ अली (Asif Ali), अन्स्वरा राजन (Anaswara Rajan), सिद्दीकी (Siddiqui) आणि जरीन शिहाब अभिनीत, 'रेखाचित्रम' हा वर्षातील सर्वोत्तम क्राईम थ्रिलर चित्रपटांपैकी एक होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची कथा एका खून प्रकरणाभोवती फिरते, ज्याचं निराकरण करण्यासाठी एका विशेष पोलीस अधिकाऱ्याला बोलावलं जातं. कथा पुढे सरकत असताना, त्यात अनेक ट्वीस्ट अँड टर्न्स येतात. जर तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर तुम्ही तो आता सोनी लिव्हवर पाहू शकता.

स्टोलन (Stolen)
अभिषेक बॅनर्जी स्टारर 'स्टोलन' सिनेमा यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या सिनेमातील अभिषेक बॅनर्जीच्या अभिनयासोबतच कथानकालाही चांगला प्रतिसाद मिळाला. ही कथा एका हरवलेल्या मुलाभोवती फिरते, पण, ती तुम्हाला वाटते तितकी सरळ नाही. चित्रपट पाहिल्यानंतर, तुम्हाला अनेक सीन्स पाहून आश्चर्य वाटेल. हा सिनेमा प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.

रोथ (Ronth)
जर तुम्हाला साऊथच्या थ्रिलर फिल्म्स पाहायला आवडत असतील, तर तुम्ही हे काही सिनेमे तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता. हा मल्याळम थ्रिलर सिनेमा शाही कबीर (Shahi Kabir) यांनी दिग्दर्शित केला आहे. रोशन मॅथ्यू आणि दिलीश पोथन अभिनीत हा सिनेमा रात्रीच्या गस्तीवर जाणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांभोवती फिरतो. सुरुवातीला अगदी साधारण वाटणारी कथा अचानक नाट्यमय वळण घेते. हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल.

हिट: द थर्ड केस (Hit: The Third Case)
नानी (Nani), श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty), सूर्य निवास आणि प्रतीक बब्बर (Prateik Smita Patil) अभिनीत 'हिट: द थर्ड केस' हा या वर्षीच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. शैलेश कोलानू दिग्दर्शित या चित्रपटाची कथा तुम्हाला हादरवून सोडेल. ही कथा एका अंधाऱ्या वेबसाइटभोवती फिरते, जी गुन्हेगारीच्या जगाला जन्म देते. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

थुडारम (Thudarum)
या यादीतील शेवटचं नाव मोहनलालचा 'थुडारम' आहे. जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा त्यानं चांगली कमाई केली. जरी हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला तरी लोकांना तो खूप आवडला. म्हणून, जर तुम्ही तो अजून पाहिला नसेल, तर तुम्ही तो आता जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. ही कथा एका टॅक्सी ड्रायव्हरभोवती फिरते, ज्याला प्रेमानं 'बेंझ' म्हटलं जातं, ज्याच्याकडे एक कार आहे, जी त्याला खूप आवडते. चित्रपटात एक असा ट्वीस्ट येतो की, काळजाचा ठोका चुकवतो. एका प्रकरणामुळे त्याची कार पोलिसांच्या चौकशीत अडकते आणि त्यात ड्रग्ज आढळतात. मग पुढे जे होतं, ते अंगावर शहारे आणणारं असतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'छावा' ते 'सैयारा' 2025 मध्ये 'या' सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; पहिला नंबर कुणाचा?























