Sushant Shelar : सुशांत शेलारने तब्येतीविषयी दिली पहिली प्रतिक्रिया, वजन कमी होण्याचंही कारण सांगितलं; म्हणाला, 'मला भयंकर आजार...'
Sushant Shelar : अभिनेता सुशांत शेलार याने त्याच्या तब्यतीविषयी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याचं वजन कमी का झालं याचंही कारण सांगितलं.
Sushant Shelar : अनेक मालिका आणि सिनेमांमधून अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचप्रमाणे सुशांत हा 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. पण काही दिवसांपासून सुशांत कोणत्याच माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी सुशांतच झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि मोठा धक्का बसला.
सुशांत शेलार हा बराच बारीक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सुशांतला काही गंभीर आजार तर झाला नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचप्रमाणे त्याच्या तब्येतीसाठी त्याचे चाहते प्रार्थना देखील करत होते. पण सुशांत इतका बारीक का झाला याचं उत्तर आता स्वत: सुशांतनेच दिलं आहे. सुशांतने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली.
सुशांतने काय म्हटलं?
सुशांतने त्याच्या तब्येतीविषयी माहिती देताना म्हटलं की, मायबाप रसिक प्रेक्षकांनी माझ्याविषयी जी काळजी व्यक्त केली, ज्या प्रार्थना केल्या त्यासाठी मी खूप त्यांचे आभार मानतो. पण स्वामींच्या कृपेने माझी तब्येत ठणठणीत आहे. मला कुठलाही महाभंयकर किंवा भयंकर आजार झालेला नाही. माझ्या कमी झालेल्या वजनाविषयी सांगायचं झालं तर माझा रानटी नावाचा सिनेमा येत्या 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. समित कक्कडने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. त्यानेच मला या भूमिकेसाठी 10 किलो वजन कमी करायला लावलं.
पुढे त्याने म्हटलं की, त्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून मला वारंवार फूड पॉयजनिंग, फूड ऍलर्जी होत होती. त्यानंतर मी काही वैद्यकीय चाचण्या केल्या, त्यामध्ये मला ग्ल्युटन ऍलर्जी डिटेक्ट झाली. ज्यामध्ये मला गहू, ब्रेड, अशा गोष्टींवर बंधनं आली आहेत. त्यामुळे माझं वजन कमी होत गेलं. त्यामध्ये माझं 7 ते 8 किलो वजन कमी झालं.हे सगळं भरुन काढण्यासाठी मला थोडा वेळ लागेल.
View this post on Instagram