एक्स्प्लोर

Dharmaveer 2 Box Office Collection : रेकॉर्डब्रेक... 3 दिवसांत बक्कळ कमाई; एकनाथ शिंदेंची भूमिका असलेला 'धर्मवीर-2' बॉक्स ऑफिसवर सुस्साट

Dharmaveer 2 Box Office Collection : धर्मवीर -2 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली असल्याचं चित्र आहे. त्यातच या सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

Dharmaveer 2 Box Office Collection : 'धर्मवीर-2 : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' (Dharmaveer 2) हा सिनेमा 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. धर्मवीरनंतर धर्मवीरच्या दुसऱ्या भागाचीही प्रेक्षकांना फार उत्सुकता होती. त्यातच अनेक कारणांमुळे या सिनेमाचं रिलीजही पुढे जात होतं. पण अखेर 27 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात आला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) रेकॉर्डब्रेक कमाई केली. 

धर्मवीर-2 हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. त्यातच तीनच दिवसांतच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असल्याचं चित्र आहे. त्यामुळे साहेबांच्या हिंदुत्वाची ही गोष्ट प्रेक्षकांनाही भावली असल्याचं म्हटलं जातंय. 

धर्मवीर -2चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅनसिल्कच्या अहवालानुसार, धर्मवीर 2 या सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षातली सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. त्यानंतरच्या शनिवार आणि रविवारही या सिनेमा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने 2.35 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 2.75 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. 

त्यामुळे तीनच दिवसांत या सिनेमाची 6.84 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. धर्मवीर-2 हा सिनेमा मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यात आला आहे. 

धर्मवीर-2ची गोष्ट

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आधारित आहे. धर्मवीर या सिनेमातही आनंद दिघे यांच्या आयुष्याचा परिचय करुन देण्यात आला होता. त्यानंतर धर्मवीर -2 मध्येही त्यांच्याच आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला असल्याचं निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी सांगितलं. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडाची देखील गोष्ट या सिनेमात असल्याचं सांगितलं जात आहे.                                                                  

View this post on Instagram
 
A post shared by Dharmaveer2 (@dharmaveerofficial)

ही बातमी वाचा : 

Kangana Ranaut : काही दिवसांपूर्वी मोठा आर्थिक फटका, आता कोट्यवधींची खरेदी; खासदार झाल्यानंतर कंगनाने तीन महिन्यांतच घेतली आलिशान कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
Embed widget