एक्स्प्लोर

Suraj Chavan Zapuk Zupuk Movie Song Launch: पोराचा बाजार उठला रं..., गुलिगत स्टार सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक'चं नवं गाणं रिलीज

Suraj Chavan Zapuk Zupuk Movie Song Launch: 'झापुक झुपूक' चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं' (Poracha Bajar Uthala Ra) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Suraj Chavan Zapuk Zupuk Movie Song Launch: जिओ स्टुडिओज (Jio Studios) प्रस्तूत आणि केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षक गीत रिलीज करण्यात आलं होतं, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा सिनेप्रेमींना भुरळ घालायला 'झापुक झुपूक' चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं' (Poracha Bajar Uthala Ra) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

सूरज चव्हाण, जुई भागवत आणि इंद्रनील कामतवर चित्रीत या गाण्यात या तिघांचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळतोय. गाण्यात प्रेमाचा त्रिकोण आपण पाहू शकतो. अभिनेत्री जुई वर सूरज आणि इंद्रनीलचा जीव जडलाय. जुईची दोघांसोबत अफलातून केमिस्ट्री पहायला मिळते जी खूप सुंदर दिसत आहे. पण विशेष म्हणजे, जुई चा शिफॉन सारी मधला कातील लूक आकर्षणाचा विषय ठरतोय. या गाण्याचे बोल आणि त्याची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. गाण्याचा हुकस्टेप सुद्धा सर्वांना थिरकवणारा आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा तितकच सुंदर आहे. ह्या गाण्याला करण सावंत ह्यांनी गायलं आहे. तर संगीत आणि बोल कुणाल करण ह्यांचं आहे.

'पोराचा बाजार उठला रं' हे गाणं रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. गाणं पाहून सिनेरसिकांची 'झापुक झुपूक' सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात एक से बढकर एक इतर उत्कृष्ट कलाकार आहेत जसे हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी जे  मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

दरम्यान, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्मात्या बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमा 25 एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे. 

पाहा व्हिडीओ : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Netflix Releases In April: नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची मेजवाणी, रिलीज होताय क्लासी फिल्म्स अन् सीरिज; आताच सेट करा वीकेंडचा प्लान

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Shaikh Sairaat: 'सैराट' सिनेमाआधीचं आयुष्य कसं होतं? अरबाज शेख नेमकं काय करायचा? म्हणाला, 'मिरवणूकीत मी...'
'सैराट' सिनेमाआधीचं आयुष्य कसं होतं? अरबाज शेख नेमकं काय करायचा? म्हणाला, 'मिरवणूकीत मी...'
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
Amol Kolhe On Savitribai Jyotirao Phule Serial: 'मी सावित्रीबाई..' मालिकेसंदर्भात अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा; 'या' तारखेपासून मालिका पुन्हा सुरू; कुठे कधी? सगळं सांगितलं...
'मी सावित्रीबाई..' मालिकेसंदर्भात अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा; 'या' तारखेपासून मालिका पुन्हा सुरू; कुठे कधी? सगळं सांगितलं...
Gulabi Saadi Fame Prajakta Ghag: नाही तर शनायाच्या जागी.. गुलाबी साडी फेम अभिनेत्रीला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसाठी ऑफर, पण
नाही तर शनायाच्या जागी.. गुलाबी साडी फेम अभिनेत्रीला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेसाठी ऑफर, पण

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA: मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त
मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त
Chandrapur Congress: धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
कर्जमाफीसाठी आंदोलक शेतकऱ्याने लाखमोलाची दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, आंदोलकांचा इशारा
कर्जमाफीसाठी आंदोलक शेतकऱ्याने लाखमोलाची दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, आंदोलकांचा इशारा
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Omraje Nimbalkar: पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
पवनराजे निंबाळकर खटला, निकालाची तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
Prakash Mahajan : भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकड चाळे, प्रकाश महाजन भडकले; म्हणाले, आयुक्तांना नोटीस बजावायलाच हवी...
Embed widget