Suraj Chavan : महाराष्ट्रभरातून प्रेम मिळालं तरीही पहिल्या सिनेमावर अन्याय? सूरज चव्हाणने प्रेक्षकांना केली कळकळीची विनंती
Suraj Chavan : सूरज चव्हाणच्या पहिल्या सिनेमावर अन्याय झाला असल्याचं म्हणत हा सिनेमा रेकॉर्डब्रेक करण्याचं आवाहन स्वत:सूरजने प्रेक्षकांना केलं आहे.
Suraj Chavan : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi New Season) विजेता झाल्यानंतर सूरजला (Suraj Chavan) संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रेम मिळतंय. बारामती ते बिग बॉसचं घर असा प्रवास करत सूरजने त्याच्या आयुष्यात यशाचा टप्पा गाठला. अभिनंदनाचा वर्षाव, कौतुकाचा थाप असं सगळंच मिळत असतानाही सूरजला मात्र त्याच्या पहिल्याच सिनेमासाठी प्रेक्षकांना कळकळीची विनंती करावी लागली आहे.
सूरजची महत्त्वाची भूमिका असलेला राजाराणी हा सिनेमा 18 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सूरजच्या हातून त्याच्या पहिल्याच सिनेमाचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला होता. पण या सिनेमा बॅन करावा अशी मागणी लोकांकडून होत असल्याचं राजाराणीच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा अशी कळकळीची विनंती स्वत:सूरजने केली आहे.
सूरजच्या पहिल्या सिनेमावर अन्याय?
राजाराणी या सिनेमाच्या टीमने सूरजसोबतचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, भावांनो सूरज चव्हाण महत्त्वाच्या भूमिकेत असलेला “राजाराणी” हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. तरी काही ठराविक लोकांकडून हा चित्रपट बॅन करावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहा.. जसा तुम्ही सूरजला बिग बॉसमध्ये सपोर्ट केला तसाच त्याच्या राजाराणी या सिनेमालाही फुल्ल सपोर्ट करा आणि रेकॉर्ड ब्रेक चित्रपट करा.
सूरजनेही प्रेक्षकांना केली कळकळीची विनंती
सूरजने प्रेक्षकांना विनंती करत म्हटलं की, नमस्कार,जय महाराष्ट्र मित्रांनो..., आमचा राजाराणी सिनेमा आहे, त्यावर अन्याय होतोय. त्याच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे.. आमचा सिनेमा आहे, तो तुम्ही थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून पाहा... त्या सिनेमाला फुल्ल सपोर्ट करा...
राजाराणी सिनेमात सूरजची 'ही' भूमिका
''राजाराणी'' या चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील प्रेमप्रकरणावर आहे. सूरज चव्हाण या चित्रपटातील नायक असलेल्या रोहन पाटीलच्या मित्राच्या भूमिकेत आहे. कठीण काळात मदत करणारा, मित्रावरील संकट आपले समजणारा, मित्र किती प्रामाणिक असावा, असे दर्शवणारी भूमिका या चित्रपटात सूरज साकारणार आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Shashank Ketkar : 'हेही नसे थोडके!' अस्वच्छतेवरुन शशांक केतकरचे प्रश्न, पालिकेने तात्काळ घेतली दखल