सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक सिनेमाने किती कमाई केली? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, 'सिनेमा पाहिला नाही त्यांनी ट्रोल..'
Suraj Chavan movie Jhapuk Jhapuk collection : सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक सिनेमाने किती कमाई केली? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, 'सिनेमा पाहिला नाही त्यांनी ट्रोल..'

Suraj Chavan movie Jhapuk Jhapuk collection : अभिनेता सूरज चव्हाणच्या मुख्य भूमिकेत असलेल्या 'झापुक झुपूक' हा मराठी चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आहे. 'झापुक झुपूक' हा चित्रपट जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित आहे.
सूरज चव्हाणच्या झापूक झापुक सिनेमाची कमाई किती?
सॅकलीन या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक या सिनेमाने 25 तारखेला म्हणजेच पहिल्या दिवशी 24 लाख रुपये कमावले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील सिनेमाने 24 लाख रुपयांची कमाई केली. मात्र, तिसऱ्या दिवशी सिनेमाची कमाई कमी झाली. रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सिनेमाने 19 लाखांची कमाई केली. झापूक झुपूक सिनेमाची तीन दिवसांची कमाई 67 लाख रुपये आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे काय म्हणाले?
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, माझा झापूक झुपूक नावाचा सिनेमा 25 एप्रिल रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. त्याला तुमचा फार छान प्रतिसाद मिळतोय. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.. त्याबद्दल मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. तीन दिवसांच्या प्रवासात आजबाजूला बऱ्याच गोष्टी घडत आहेत. मी लोकांना भेटतोय. ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांच्याकडून अप्रतिम प्रतिसाद मिळतोय. ज्यांनी सिनेमा पाहिला नाही, त्यांनी भरमसाठ ट्रोल केलंय. ट्रोल करण्याबद्दल मला काहीच प्रॉबलेम नाही. ट्रोल करणारे किती काम करतात याबाबत नेहमीच प्रश्न पडतो. कलाकृती सादर करणे हे आमचं काम आहे. त्यानंतर तुम्ही ती कलाकृती पाहून योग्य तो फिडबॅक देण्याची गरज आहे. चांगल्या, वाईट कमेंटची सवय मला गेल्या 32 वर्षांपासून आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























