एक्स्प्लोर

Director Shameless Demand To Actress: 'कपडे काढ आणि इनरवेअरमध्ये माझ्यासमोर येऊन बस...'; प्रसिद्ध दिग्दर्शकाची घाणेरडी मागणी, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

Director Shameless Demand To Actress: एका अभिनेत्रीनं सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवर खूप गंभीर आरोप केलं आहेत. अभिनेत्रीनं खुलासा केलाय की, काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खाननं तिच्याकडून एक अतिशय घाणेरडी मागणी केली होती.

Director Shameless Demand To Actress: कित्येक बॉलिवूड (Bollywood News) सौंदर्यवतींनी कास्टिंग काऊचबाबत (Casting Couch) उघडपणे भाष्य करुन ग्लॅमरस दिसणाऱ्या बॉलिवूडची काळी बाजू सर्वांसमोर मांडली आहे. अनेक अभिनेत्रींनी (Actress) त्यांच्यासोबत घडलेल्या नको त्या प्रसंगाबाबत सर्वांसमोर खुलासा करुन इंडस्ट्री हादरवून सोडली आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. या अभिनेत्रीनं थेट बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर (Famous Bollywood Director) गंभीर आरोप केले आहेत. तसेच, आरोपांनंतर अभिनेत्रीनं म्हटलंय की, तिला पुन्हा कधीच या दिग्दर्शकाला भेटायचं नाही. 

अनेक सिनेमे आणि टीव्ही शोमध्ये (TV Show) काम करणारी अभिनेत्री नवीना बोले (Actress Navina Bole) हिनं प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवर कास्टिंग काऊचचा आरोप केला आहे. सुभोजित घोषच्या यूट्यूब चॅनलला अलिकडेच दिलेल्या मुलाखतीबाबत बोलताना नवीना बोले हिनं अनेक गोष्टींवर उघडपणे भाष्य केलं. नवीना बोलेनं खुलासा केलाय की, काही वर्षांपूर्वी साजिद खाननं तिच्याकडून एक अतिशय घाणेरडी मागणी केली होती. 

'साजिद खाननं मला घरी बोलावलं आणि चुकीच्या मागण्या केल्या...', असं नवीना बोले हिनं म्हटलं आहे. साजिद खान त्यावेळी 'हे बेबी' सिनेमासाठी कास्टिंग करत होता. त्यावेळी त्यानं मलाही ऑडिशन देण्यासाठी बोलावून घेतलं. ठरल्याप्रमाणे मी त्यानं सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानं सर्वात आधी मला माझे कपडे काढून इनरवेअर्सवर बसायला सांगितलं. त्यावेळी त्यानं सांगितलं की, मला तू किती कंफर्टेबल आहेस? हे पाहायचं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्रीनं केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. दरम्यान, अभिनेत्री नवीना बोले 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आणि 'सीआयडी' सारख्या शोमध्ये दिसून आली होती. 

'तू कपडे काढून, इनरवेअरमध्ये माझ्या समोर येऊन बस...'

नवीना बोले म्हणाली की, 'एक खूप भयानक माणूस आहे, ज्याला मी माझ्या आयुष्यात कधीही भेटू इच्छित नाही, त्याचं नाव साजिद खान आहे. महिलांचा अनादर करण्याच्या बाबतीत त्यानं खरोखरच मर्यादा ओलांडल्या आहेत. जेव्हा त्यानं मला फोन केला, तेव्हा मी खूप आनंदात होते. मी ठरल्याप्रमाणे तिथे गेले आणि मग तो म्हणाला की, तू तुझे सगळे कपडे काढून इनरवेअरमध्ये का बसत नाहीस? मला बघायचंय की, तू तुझ्या शरीरासोबत किती कंफर्टेबल आहेस.'

'जर तू स्टेजवर बिकिनी घालतेस तर...'

'इश्कबाज' मधील अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'मी 2004, 2006 बद्दल बोलत आहे. सुदैवानं कोणीतरी खाली माझी वाट पाहत होतं. पण, ज्यावेळी साजिद मला असं म्हणाला, त्यावेळी मला काय उत्तर द्यावं, हे कळत नव्हतं आणि तेवढ्यात तो म्हणाला की? तू स्टेजवर बिकिनी घालतेस, मग काय अडचण आहे? त्याच्या भाषेत हे सर्व मूर्खपणाचं आहे. तुम्ही इथे येऊन आरामात बसू शकता, तुमच्या इच्छेनुसार राहू शकता. मला काय बोलावं, ते कळत नव्हतं आणि मी म्हणाले की, जर तुम्हाला हेच पहायचं असेल, तर मला घरी जाऊन बिकिनी घालावी लागेल आणि मी आत्ता माझे कपडे काढू शकत नाही.'

नवीना बोले म्हणाली की, "कसा तरी मी तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झालो. त्यानं मला कमीत कमी 50 वेळा फोन करून विचारलं असेल की, मी कुठे पोहोचलो आणि मी का येत नाही? अतिशयोक्ती करत नाही."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पदार्पणातच गाजला, लग्नासाठीचे 30 हजार प्रपोजल धुकावून अभिनेत्याच्या मुलीशी संसार थाटला, घटस्फोटानंतर 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करतोय रोमान्स

महत्त्वाच्या बातम्या

Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Megha Ghadge on Ashok Saraf: 'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
Colors Marathis Mi Jinkun Ghein Saar: 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget