एक्स्प्लोर

'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याच्या बॅगेत 35 कोटींचं कोकेन; एअरपोर्टवरच ठोकल्या बेड्या

कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने या अभिनेत्याला रविवारी पहाटे सिंगापूरहून चेन्नईत दाखल होताच थांबवले. तपासणीदरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगच्या खालच्या गुप्त कप्प्यात कोकेन लपवल्याचं आढळलं

Student of the year fame actor arrest in drug case:  बॉलीवूड आणि ड्रग्स हे कनेक्शन अनेक वेळा समोर आलं आहे.  नुकतच 'स्टुडन्ट ऑफ द इयर' या चित्रपटात काम केलेल्या एका सहकलाकाराला चेन्नई एअरपोर्टवर ड्रग तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली. (Drugs Trafficking)  या अभिनेत्याकडून पोलिसांनी 3.5 किलो कोकेन जप्त केलं आहे. या ड्रग्स ची किंमत अंदाजे 35 कोटी असल्याची प्राथमिक माहिती आहे . नुकताच सिंगापूर मधून परत येत होता तेव्हा त्याला कस्टम आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या संयुक्त पथकाने रोखलं . त्याच्या ट्रॉली बॅगच्या एका सीक्रेट डब्यात कोकेन लपवल्याचं आढळलं .  

या अभिनेत्याचं नाव अजून उघड झालेलं नाही . बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये लहानसहान भूमिका करणाऱ्या या सहकलाकाराला विमानतळावर थांबवण्यात आलं .त्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी 3.5 किलोच्या अंमली पदार्थासह त्याला पकडण्यात आले .(Crime News)

नेमके घडले काय?

विशेष गुप्त माहितीच्या आधारे कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने या अभिनेत्याला रविवारी पहाटे सिंगापूरहून चेन्नईत दाखल होताच थांबवले. तपासणीदरम्यान त्याच्या ट्रॉली बॅगच्या खालच्या गुप्त कप्प्यात प्लास्टिक पिशव्यांत पांढऱ्या रंगाचे पावडरसदृश्य पदार्थ आढळले. प्राथमिक चाचणीत ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.

अधिकाऱ्यांनी अभिनेत्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली असता तो कंबोडियाहून सिंगापूरमार्गे चेन्नईला आला असल्याचे उघड झाले. त्याने सांगितले की, कंबोडियामध्ये काही अनोळखी लोकांनी त्याला ही ट्रॉली दिली होती व ती चेन्नई विमानतळावर एका व्यक्तीकडे सुपूर्द करायची होती. मात्र, तपास यंत्रणांना शंका आहे की, हे कोकेन मुंबई किंवा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलकडे पोहोचवण्याचा त्याचा हेतू होता. DRI या संपूर्ण जाळ्याचा शोध घेत असून कस्टम्स विभाग त्याच्या प्रवासाच्या नोंदींची चौकशी करत आहे, जेणेकरून याआधीही त्याने अशा प्रकारे अंमली पदार्थांची तस्करी केली आहे का याचा उलगडा होऊ शकेल.

दरम्यान, मागील दोन आठवड्यांत चेन्नई विमानतळावर कोकेनची ही दुसरी मोठी पकड आहे. 16 सप्टेंबर रोजी इथिओपियाहून आलेल्या केनियाच्या नागरिकाकडून 2 किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. तर 1 सप्टेंबर रोजी चेन्नई कस्टम्सने 5.6 किलो कोकेन फेरेरो रोशेर चॉकलेटच्या डब्यांत लपवून आणणाऱ्या दोन प्रवाशांना अटक केली होती.

हेही वाचा 

Actor Sarang Sathaye Married With Girlfriend: Love Will Always Win! अखेर 12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पॉला आणि सारंगनं उडवला लग्नाचा बार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget