Actor Sarang Sathaye Married With Girlfriend: Love Will Always Win! अखेर 12 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पॉला आणि सारंगनं उडवला लग्नाचा बार
Actor Sarang Sathaye Married With Girlfriend: सारंगनं लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं खास कॅप्शनही दिलं आहे.

Actor Sarang Sathaye Married With Girlfriend: सोशल मीडियावरचं मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलेलं चॅनल म्हणजे, भाडीपा. याच भाडीपामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातघरात पोहोचलेलं जोडपं म्हणजे, पॉला आणि सारंग साठ्ये. तब्बल 12 वर्ष पॉला आणि सारंग रिलेशलशिपमध्ये होते. अखेर दोघांनी आपली साताजन्माची गाठ बांधली आहे. सारंग आणि पॉलानं लग्न केलं. 28 सप्टेंबर रोजी परदेशात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक आणि खास मित्रपरिवार लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. सारंगनं लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं खास कॅप्शनही दिलं आहे.
सारंग साठ्येनं आपल्या ऑफिशिअल अकाउंटवरुन दोघांच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत खास कॅप्शनही शेअर केलं आहे. सारंगनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "होय आम्ही लग्न केलंय! लग्न आमच्यासाठी कधीच प्राधान्याची गोष्ट नव्हती, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. पण एकमेव गोष्ट जी आम्हाला वेगळं ठेवत होती ती म्हणजे कागदाचा तुकडा. मागील वर्ष कठीण होते. पहिल्यांदाच आम्हाला विभक्त होण्याची भीती वाटत होती. पण प्रेम कायमच द्वेषावर विजय मिळवतं..."
View this post on Instagram
"आमचं प्रेम आणि आमची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी, आम्ही काल 28/09/2025 रोजी, तो 'कागद' मिळवला. हा विवाह सोहळा अगदी खासगी होता. आमचे जवळचे कुटुंब आणि काही मित्र-मैत्रिणी 'डीप कोव्ह' (Deep Cove) येथील आमच्या आवडत्या झाडाजवळ जमले. आमच्या दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याची ही एक उत्तम संधी होती. आम्ही एकमेकांना आमच्या गोष्टी सांगितल्या, गाणी गायली आणि यापुढेही प्रेमी आणि जिवलग मित्र म्हणून राहण्याचे वचन दिले! बस, हीच आहे आमची छोटीशी गोष्ट! प्रेम नेहमीच जिंकेल! (Love Will Always Win!)", अशा शब्दात सारंग साठ्येनं पोस्ट शेअर केली आहे.
























