(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रसिद्ध कोरिओग्राफरला पोक्सो गुन्ह्यात अटक, 21 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कारवाई
Stree 2 Aaj Ki Raat Song Choreographer : स्त्री 2 चित्रपटातील 'आज की रात' गाण्याचा कोरिओग्राफर जानी मास्टरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याचा अटक करण्यात आली आहे.
Famous Choreographer Arrested Under POSCO : स्त्री 2 चित्रपटाने जगभरात कोट्यवधींची कमाई केली असून अजूनही याचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. 'स्त्री 2' चित्रपटातील एका कलाकारावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्त्री 2 चित्रपटाच्या कथेसह त्यातील आज 'आज की रात' गाणंही चाहत्यांच्या चांगलं पसंतीस उतरलं. या गाण्याच्या कोरियोग्राफवर संदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्याविरोधात आता लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'स्त्री 2' चित्रपटातील कलाकाराला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक
स्त्री 2 चित्रपटातील 'आज की रात' गाण्याचा कोरिओग्राफर जानी मास्टरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याचा अटक करण्यात आली आहे. जानी मास्टर हे प्रसिद्ध कोरिओग्राफर असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. जानी मास्टरने बाहुबली आणि पुष्पा सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे. या तेलगू कोरिओग्राफरच्या तालावर अनेक मोठे स्टार्सही नाचले आहेत. पण आता याला पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
21 वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कारवाई
कोरिओग्राफर जानी मास्टरवर त्याच्यासोबत काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. आता या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीने कोरिओग्राफरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर हैदराबाद पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.
नेमकं प्रकरण काय?
कोरिओग्राफर जानी मास्टर यांच्यासोबत काम करणाऱ्या एका तरुणीने त्याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. जानी मास्टरचं खरं नाव शेख जानी आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, जानी मास्टरला सायबराबाद पोलिसांनी गोव्यात अटक केली होती, जिथे त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल. कोर्टाकडून 'ट्रान्झिट वॉरंट' मिळाल्यानंतर त्याला हैदराबादला आणण्यात येणार आहे
कोरिओग्राफर जानी मास्टरवर आरोप काय?
जानी मास्टरने आऊटडोअर शूटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानंतर सायबराबाद पोलिसांनी जानी मास्टरवर गुन्हा दाखल केला आहे. रायदुर्गम पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे 'शून्य एफआयआर' नोंदवला आणि त्यानंतर जानी मास्टरला अटक करण्यात आली आहे.