Sreeleela On Bathroom Selfie: सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा बाथरूम सेल्फी व्हायरल, हात जोडून म्हणाली, 'विनंती करतेय...'
Sreeleela On Bathroom Selfie: सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीलाचा एक बाथरुम सेल्फी व्हायरल होत आहे. या सेल्फीनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

Sreeleela On Bathroom Selfie: सध्याचं युग AI (Artificial Intelligence) चं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, AI जेवढं काम सोपं करतंय, तेवढंच ते डोक्यासाठी ताप ठरतंय. अशातच सोशल मीडियावर अगदी मिनिटामिनिटाला AI जनरेटेड फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधीकधी ते पाहायला गंमत वाटते, पण कधीकधी अगदी डोकेदुखी ठरतात.
सोशल मीडियावर सध्या सेलिब्रिटींची प्रायव्हसी (Celebrity Privacy) आणि ऑनलाईन नीतिमत्तेबद्दल (Online Ethics) वादविवाद सुरू आहेत. तंत्रज्ञान जसजसं वेगानं पुढे जातंय, तसतसं ते सेलिब्रिटींसाठी धोकादायक बनत चाललंय. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही प्रसिद्ध सेलिब्रिटींचे AI-जनरेटेड (AI Generated) पोर्नोग्राफिक फोटो व्हायरल होतात. अशाच एक फोटो सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीलाचा व्हायरल (Sreeleela Viral Photo) होतोय. यावर तिचं म्हणणं आहे की, व्हायरल होणारा फोटो तिचा नाही, तर या फोटोचा काहीजण गैरवापर करत आहेत. श्रीलीलानं सोशल मीडियावर पोस्ट करुन स्वतः याबाबत खुलासा केला आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये श्रीलीला काय म्हणाली? (Sreeleela Social Media Post On Bathroom Selfie)
श्रीलीलानं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं म्हटलंय की, "मी तुम्हा सर्वांना हात जोडून हे सांगतेय आणि मी प्रत्येक सोशल मीडिया युजर्सना विनंती करू इच्छिते की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या AI जनरेटेड मूर्खपणाचं समर्थन करू नये. वापरणं आणि गैरवापर करणं यात खूप फरक आहे. जर तंत्रज्ञानाची प्रगती होत असेल तर ती जीवन सोपे करण्यासाठी आहे, ते उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, हेच माझं मत आहे..."
"जगातील प्रत्येक मुलगी ही कोणाची तरी मुलगी, नात, बहीण, मैत्रीण किंवा जोडीदार असते, मग ती कला व्यवसाय म्हणून निवडत असो. आम्ही अशा उद्योगाचा भाग आहोत जो आनंद पसरवण्यावर विश्वास ठेवतो आणि ज्या वातावरणात आपण राहतो, ते आपल्यासाठी सुरक्षित आहे या आत्मविश्वासानं...", असं श्रीलीलानं सोशल मीडिया पोस्टवर वक्तव्य केलंय.
View this post on Instagram
"ऑनलाईन खूप काही चालू आहे आणि मला ते सर्व माहिती आहे. दरम्यान, कधीकधी, माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे, मी गोष्टी पाहू शकत नाही. या गोष्टी माझ्या लक्षात आणून दिल्याबद्दल मी माझ्या मित्रांचं आणि शुभचिंतकांचे आभार मानते. मी नेहमीच गोष्टींना चिमूटभर मिठासारखं पाहते आणि माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या मनाप्रमाणे जगलेय. पण हे माझ्यासाठी खूप निराशाजनक आहे. माझे काही मित्र देखील या घटनेला तोंड देत आहेत...", असंही श्रीलीला म्हणाली. दरम्यान, श्रीलीलाच्या वक्तव्याला रश्मिका मंदानानं पाठींबा दिलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























