एक्स्प्लोर

'पुष्पा 2' नंतर आता 'या' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता; 2022 मध्ये रचलेला इतिहास, 2025 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवणार?

Most Awaited South Cinema: देशभरात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या 'पुष्पा 2: द रुल' या सर्वात मोठ्या चित्रपटानं सरत्या वर्षात सर्वांना अक्षरशः वेड लावलं. पण, आता 2025 साठी सर्वांच्या नजरा 'कांतारा: चॅप्टर 1' वर (Kantara Chapter 1) आहेत.

Kantara- Chapter 1: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2: The Rule) चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का? असा एक मोस्ट अवेटेड चित्रपट आहे, ज्याच्या पहिल्या पार्टनं 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती आणि आता त्याचा दुसरा भाग 2025 मध्ये रिलीज होणार आहे. 'पुष्पा 2' नंतर आता सर्वजण त्याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

आपण लवकरच 2024 वर्षाचा निरोप घेणार आहोत आणि सर्वजण मोठ्या उत्साहानं 2025 ची वाट पाहत आहेत. मनोरंजन विश्वातही नवं वर्ष कोणते नवनवीन सरप्राईज मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. देशभरात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या 'पुष्पा 2: द रुल' या सर्वात मोठ्या चित्रपटानं सरत्या वर्षात सर्वांना अक्षरशः वेड लावलं. पण, आता 2025 साठी सर्वांच्या नजरा 'कांतारा: चॅप्टर 1' वर (Kantara Chapter 1) आहेत. होय, 'कांतारा: चॅप्टर 1' हा 2025 चा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. 2022 च्या ब्लॉकबस्टर कांताराचा हा प्रीक्वल असल्यानं, लोकांच्या अपेक्षा आधीच खूप उंचावलेल्या आहेत. आगामी चित्रपटात रिषभ शेट्टी प्रेक्षकांना काय सरप्राईज देणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 

तसं पाहायला गेलं तर, 'बाहुबली'पासून पॅन इंडिया फिल्म्सचं युग सुरू झालं. 'बाहुबली' ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यानं भाषेतले सगळे अडथळे दूर केले आणि संपूर्ण देशाचं मनोरंजन केलं. यानंतर KGF आला, ज्यानं संपूर्ण भारतातील चित्रपटांना एक नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. एखाद्या चित्रपटासाठी देशभरात यापूर्वी कधीही न पाहिलेली क्रेझ निर्माण झाली. यानंतर 'पुष्पा: द राइज' आला, ज्यानं प्रचंड खळबळ उडवून दिली. दरम्यान, 'कांतारा'नं 2022 साली बॉक्स ऑफिसवर जबरदस्त एंट्री केली आणि अनेक रेकॉर्ड मोडले. त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा सहावा भारतीय चित्रपट ठरला होता. त्यामुळे आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती, 'कांतारा: चॅप्टर 1'ची.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KAANI STUDIO (@kaanistudio)

बाहुबली, पुष्पा आणि केजीएफचे सीक्वेल्स आले आहेत आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. त्यामुळे आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती, कांताराच्या दुसऱ्या पार्टची. इतर चित्रपटांच्या सिक्वेलला जसं उत्तुंग यश मिळालं, तशाच अपेक्षा कांताराकडूनही आहेत. 2022 मध्ये जेव्हा कांतारा रिलीज झाला, तेव्हा तो वर्षातील सर्वात मोठा हिट ठरला आणि देशभरातील लोकांची मनं जिंकली. भारताच्या हृदयाशी जोडलेल्या या विशेष कथेनं देशाचा समृद्ध वारसा आणि परंपरा सर्वांसमोर आणल्या. या अनोख्या कथेनं प्रेक्षकांशी घट्ट नातं निर्माण केलं आणि त्यांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव दिला.

चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानं सर्वांना आश्चर्यचकित केलं, इतिहास रचला आणि भारतीय चित्रपटांचं स्टँडर्ड पुन्हा उंचावर नेलं. कांताराला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तर ऋषभ शेट्टीला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

चित्रपटाबाबत थोडसं... 

'कांतारा चॅप्टर 1' हा  2025 चा खूप मोठा चित्रपट ठरू शकतो, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. हा चित्रपट कर्नाटकातील कदंबा काळातील आहे. कदंबा शासक हे कर्नाटकातील काही भागांचे महत्त्वाचे शासक होते आणि त्यांनी या प्रदेशाची संस्कृती आणि वास्तुकला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कथेला जिवंत करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीला त्यांनी 80 फूट उंचीचा मोठा सेट शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना योग्य सेट सापडला नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा स्टुडिओ बांधला. या कठोर परिश्रमामागे कदंबा घराण्याचं महत्त्व आहे, ज्यानं दक्षिण भारतीय स्थापत्य कलेची चमकदार सुरुवात केली. कदंबा काळ हा भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या समृद्धी आणि मनं जिंकणाऱ्या सौंदर्यासाठी ओळखला जातो.

'कंतारा: चॅप्टर 1' साठी ऋषभ शेट्टीनं कलारीपयट्टूचे प्रशिक्षण घेतलं आहे. ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात सायंटिफिक मार्शल आर्ट्सपैकी एक आहे, ज्याचा उगम केरळमधून झाला. आपल्या मार्शल आर्ट्सला परिपूर्ण करण्यासाठी अभिनेत्यानं एक वर्ष कठोर प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

The Secret Of Shiledar Teaser Out: छत्रपती शिवरायांचा खजिना अन् 17व्या शतकातील रहस्यांचं गूढ; 'द सिक्रेट ऑफ शिलेदार'चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात मोठी अपडेट; दोन्ही शिक्षकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात मोठी अपडेट; दोन्ही शिक्षकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Rishabh Pant : पहिल्या कसोटीत शूज निघाला, रिषभ पंतकडून या मॅचमध्ये हातातून बॅट निसटली अन्.. शुभमन गिल तातडीनं भेटला,बुमराहला हसू आवरेना
रिषभ पंतला सिक्स मारायचा होता पण हातातून बॅट निसटली अन् .. शुभमन भेटायला गेला, बुमराहला हसू आवरेना
Ajit Pawar : अजित पवार 'माळेगाव'चे चेअरमन, विरोधकांचा आक्षेप, तर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता वेळ संपली
अजित पवार 'माळेगाव'चे चेअरमन, विरोधकांचा आक्षेप, तर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता वेळ संपली
Nehal Modi : पळपुट्या नीरव  मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक, भारतात कधी आणलं जाणार? 17 जुलै रोजी सुनावणी
नीरव  मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक, भारतात कधी आणलं जाणार? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane PC | आम्हाला उद्धव ठाकरे लांबून औरंगजेब वाटतात, नितेश राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Malegaon Sugar Mill Election | अजित पवार चेअरमनपदी, विरोधकांचा आक्षेप
Thackeray Reunion | Raj-Uddhav एकत्र, १९ वर्षांनी मनोमिलन, मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी
Sushil Kedia :मी अती बोललो..ऑफिस फुटताच राज ठाकरेंचं कौतूक, केडियाचा माज उतरला!
Raj -  Uddhav Thackeray : दोन्ही ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र,राजकीय युतीही लवकरच? पुढे काय होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात मोठी अपडेट; दोन्ही शिक्षकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात मोठी अपडेट; दोन्ही शिक्षकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Rishabh Pant : पहिल्या कसोटीत शूज निघाला, रिषभ पंतकडून या मॅचमध्ये हातातून बॅट निसटली अन्.. शुभमन गिल तातडीनं भेटला,बुमराहला हसू आवरेना
रिषभ पंतला सिक्स मारायचा होता पण हातातून बॅट निसटली अन् .. शुभमन भेटायला गेला, बुमराहला हसू आवरेना
Ajit Pawar : अजित पवार 'माळेगाव'चे चेअरमन, विरोधकांचा आक्षेप, तर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता वेळ संपली
अजित पवार 'माळेगाव'चे चेअरमन, विरोधकांचा आक्षेप, तर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता वेळ संपली
Nehal Modi : पळपुट्या नीरव  मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक, भारतात कधी आणलं जाणार? 17 जुलै रोजी सुनावणी
नीरव  मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक, भारतात कधी आणलं जाणार? 
Raj Thackeray Speech Video: लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? ठाकरेंची शाळा काढताच राज ठाकरेंनी फडणवीसांची घेतली 'शाळा'
Video: लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? ठाकरेंची शाळा काढताच राज ठाकरेंनी फडणवीसांची घेतली 'शाळा'
ठाकरेंचा ग्रँड मेळावा, भाजपच्या मुनगंटीवार, राणे, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; भुजबळही स्पष्टच बोलले
ठाकरेंचा ग्रँड मेळावा, भाजपच्या मुनगंटीवार, राणे, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; भुजबळही स्पष्टच बोलले
Raj Thackeray-Uddhav Thackeray: मराठीची लेकरं म्हणून रिंगणात उतरू..! वरळी डोममध्ये राज उद्धव भेटीचा साक्षीदार होताच जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले?
मराठीची लेकरं म्हणून रिंगणात उतरू..! वरळी डोममध्ये राज उद्धव भेटीचा साक्षीदार होताच जितेंद्र आव्हाड काय काय म्हणाले?
IND  vs ENG 2nd Test 4th Day :  दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचं पहिलं सत्र भारताच्या नावावर, भारताकडे 357 धावांची आघाडी, पंत- गिल जोडी मैदानावर
दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचं पहिलं सत्र भारताच्या नावावर, भारताकडे 357 धावांची आघाडी, पंत- गिल जोडी मैदानावर
Embed widget