एक्स्प्लोर

कन्नड भाषेची उत्पत्ती तेलगू भाषेपासून झाली, कमल हसन यांच्या वक्तव्याने कर्नाटकात राडा, हायकोर्टात धाव घेण्याची वेळ

south cinema kamal haasan statement controversy : कन्नड भाषेची उत्पत्ती तेलगू भाषेपासून झाली, कमल हसन यांच्या वक्तव्याने वाद चिघळला, हायकोर्टात धाव घेण्याची वेळ

south cinema kamal haasan statement controversy : कमल हासन यांच्या कन्नड भाषेच्या उत्पत्तीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद चिघळला आहे. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने कठोर इशारा दिला आहे की जर अभिनेते कमल हसन यांनी माफी मागितली नाही, तर त्यांचा आगामी चित्रपट ‘ठग लाइफ’ राज्यात प्रदर्शित होणार नाही. दरम्यान, आता कमल हसन यांच्याकडून कर्नाटक उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यात चित्रपटाचे प्रदर्शन कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.

कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष एम. नरसिंहालु म्हणाले, "हा वाद आता केवळ चित्रपटसृष्टीपुरता राहिलेला नाही. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर ‘ठग लाइफ’ कर्नाटकमध्ये प्रदर्शित होणार नाही, हे निश्चित आहे. ही गोष्ट केवळ चित्रपटसृष्टीची नाही, तर संपूर्ण राज्याची प्रतिष्ठा यामध्ये गुंतलेली आहे. अगदी राजकीय पक्षही याला विरोध करत आहेत. प्रोकन्नड संघटना म्हणत आहेत की त्यांना उत्तर द्यावेच लागेल. माफीशिवाय चित्रपट प्रदर्शित करणे कठीण आहे. आमचे लोक तो चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नाहीत. मग अशा परिस्थितीत कसा काय चित्रपट रिलीज होणार?"

मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला विरोध

हा वाद ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान सुरू झाला, ज्यामध्ये कमल हासन यांच्यासोबत त्रिशा कृष्णन आणि सिलंबरासन टीआर हेही उपस्थित होते. दक्षिण भारतातील संस्कृती आणि भाषिक नातेसंबंधांवर बोलताना कमल हासन यांनी म्हटले की "कन्नड भाषेची उत्पत्ती तमिळमधून झाली आहे." त्यांच्या या विधानावर राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "कन्नड भाषेला स्वतःचा समृद्ध इतिहास आहे आणि कमल हासन यांना त्याची माहिती नाही."

कमल हासन यांच्या विधानावरून राजकारण तापले

भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनीही अभिनेत्याने माफी मागावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, "प्रत्येकाने आपल्या मातृभाषेवर प्रेम करायला हवे, पण त्याच्या नावावर अहंकार दाखवणे हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. विशेषतः कलाकारांसाठी प्रत्येक भाषेचा सन्मान करणे गरजेचे असते." विजयेंद्र यांनी हेही नमूद केले की कमल हासन यांनी अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत, ज्यात कन्नड भाषाही समाविष्ट आहे, पण त्यांचे वक्तव्य अहंकार दर्शवणारे आहे. काही प्रमुख कन्नड संघटना आणि भाषा कार्यकर्तेही या मागणीमध्ये सामील झाले आहेत. ते कमल हासन यांनी आपले विधान परत घ्यावे आणि जनतेसमोर माफी मागावी, अशी मागणी करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

20 वर्षांची असतानाच सिनेसृष्टी दणाणून सोडली, प्रभास-NTR सोबत चित्रपटात काम; 5 स्टार हॉटेलमध्ये देहविक्री प्रकरणात झाली होती अटक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramesh Pardeshi: संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report
Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report
Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Pardeshi: संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Shivsena Vs BJP: भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
Suraj Chavan New Home Video Viral: अजितदादांनी गुलिगत स्टार सूरज चव्हाणला पत्र्याच्या घरातून अलिशान बंगल्यात आणलं; गृहप्रवेशाचा व्हिडीओ पाहून म्हणाले...
अजितदादांनी गुलिगत स्टार सूरज चव्हाणला पत्र्याच्या घरातून अलिशान बंगल्यात आणलं; गृहप्रवेशाचा व्हिडीओ पाहून म्हणाले...
Embed widget