South Actors in Politics : एनटीआर, जयललिता ते करुणानिधी; दक्षिणेतील राजकारणाला सिने कलाकारांच्या वर्चस्वाचा इतिहास, आता थलापतीही करतोय एन्ट्री
South Actors in Politics : साऊथ स्टार विजय थलापती (Thalapathy Vijay) लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि मोठा चाहता वर्ग असणाऱ्या विजयला राजकारणात किती यश मिळणार?
South Actors in Politics : साऊथ स्टार विजय थलापती (Thalapathy Vijay) लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि मोठा चाहता वर्ग असणाऱ्या विजयला राजकारणात किती यश मिळणार? हे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र, दक्षिण भारतातील राजकारणात सिने कलाकारांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. एनटीआर, जयललिता ते करुणानिधी (South Actors) यांचे दक्षिणेतील राजकारणात निर्विवाद वर्चस्व होते. सध्या रजनीकांत, पवन कल्याण (Kamal Haasan) पासून कमल हसन हे देखील राजकारणात सक्रीय होते. जाणून घेऊयात दक्षिणेतील राजकारणात सिनेकलाकारांच्या वर्चस्वाबाबत...
1. एनटीआर
एनटीआर दाक्षिणात्य अभिनेते होते. शिवाय, निर्माते आणि राजनितीतज्ज्ञही होती. त्यांनी 1982 मध्ये तेलगू देसम पक्षाची स्थापना केली. त्यांनी तीन कालखंडात 7 वर्षे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. एनटीआर 1983 ते 1995 दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राजकारणात पदार्पण केले तेव्हा ते दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांच्या चाहत्या वर्गाने त्यांना मतदान केले होते.
2. जयललिता जयराम
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी 1961 ते 1980 दरम्यान जवळपास 140 सिनेमे केले होते. सिनेक्षेत्रात स्वत:ला सिद्ध केल्यानंतरही त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री आणि त्यांच्या नृत्यकलेलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. जयललिता यांनी 1982 एम.जी.रामचंद्रन यांनी स्थापन केलेल्या ए.आय.डी.एमके या पक्षात सामील झाल्या. 1991 मध्ये त्या पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. तामिळनाडू नेतृत्व करणाऱ्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून जयललिता यांचा उल्लेख केला जातो.
3. करुणा निधी
चित्रपटापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत करुणानिधी यांचा प्रवास अतिशय रंजक होता. ते नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून काम करत होते. चाहत्यांनी त्यांना कलनैर हे नाव दिले होते. कलनैर हा शब्दाचा अर्थ तामिळ भाषेतील विद्वान असा होतो. करुणानिधी सिनेक्षेत्रातून राजकारणात आले आणि तब्बल 5 वेळेस तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. करुणानिधी यांनी 1969 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच वर्षी द्रमुकचे संस्थापक सीएन अन्नादुराई यांचे निधन झाले होते. त्यानंतर पक्षाचे नेतृत्व करुणानिधींकडे सुपूर्द करण्यात आले होते. करुणानिधी पहिल्यांदा (1969) आणि दुसऱ्यांदा (1971) तामिळनाडूचे सीएम झाले
4. अभिनेते विजयकांत
दक्षिणेच्या राजकारणातील एक महत्वाचे नाव आहे, जे सिनेक्षेत्रातून राजकारणात आले. अभिनेते विजयकांत यांनीही सिनेसृष्टीत मोठे नाव कमावले होते. मात्र, त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. 2011 ते 2016 या कालखंडात ते तामिळनाडूच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते होते. 2005 मध्ये त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली होती. एकदा त्यांनी रजनीकांत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांना जनतेच्या रोषालाही सामोर जावे लागले होते.
5. रजनीकांत, कमल हसन ते पवन कल्याण
सध्याच्या घडीला अभिनेते पवन कल्याण राजकारणात सक्रिय आहेत. याशिवाय, कमल हसन आणि रजनीकांतही सिनेक्षेत्रात स्टारडम असतानाही राजकारणात आले. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने कालच रजनीकांत यांच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. रजनीकांत यांच्यावर भाजपला सपोर्ट करत असल्याचे आणि ते संघी असल्याचे आरोप करण्यात येत होते. मुलगी ऐश्वर्याने या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. माझे वडिल संघी असते तर त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता, असे ऐश्वर्याने म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या