एक्स्प्लोर

Thalapathy Vijay : साऊथ स्टार थलापती विजय आता राजकारणात करणार एंट्री; लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घेणार मोठा निर्णय

Thalapathy Vijay : दाक्षिणात्य अभिनेते आजवर सिनेक्षेत्राबरोबरच राजकारणातही आपली छाप सोडताना दिसले आहेत. अनेक अभिनेते हिट सिनेमे केल्यानंतर राजकारणात सक्रीय झाले होते.  दरम्यान आता थलापती विजयही (Thalapathy Vijay)  राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.

Thalapathy Vijay : दाक्षिणात्य अभिनेते आजवर सिनेक्षेत्राबरोबरच राजकारणातही आपली छाप सोडताना दिसले आहेत. अनेक अभिनेते हिट सिनेमे केल्यानंतर राजकारणात सक्रीय झाले होते.  दरम्यान आता थलापती विजयही (Thalapathy Vijay)  राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. थलापती विजय (Thalapathy Vijay) रजनीकांत आणि कमल हसन (Kamal Haasan) यांच्याप्रमाणेच राजकारणाच्या मार्गावर जाताना दिसतोय. यापूर्वीही दाक्षिणात्य अभिनेते राजकारणात उतरले. त्यांचा राजकारणातील इतिहास मोठा आहे. अभिनेते करुणानिधी यांनी सिनेक्षेत्रातून कारकिर्द सुरु केली. त्यानंतर राजकारणात आले आणि मुख्यमंत्री देखील झाले. पुढे त्यांनी तब्बल 5 वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.

विजय थलापतीच्या जनलर काऊंसिलचे विजय मक्कल इय्यकम यांनी याबाबतच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सुपरस्टार विजय लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकारणात एंट्री करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. राजकारणातील प्रवेशाबाबत गुरुवारी (दि.27) एक बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर राजकारणातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे बोलले जात आहे. साऊथ स्टार विजय थलापतीचा चाहता वर्ग मोठा आहे. या शिवाय सामाजिक कार्यातही विजय अग्रेसर असतो. त्यामुळे लोकांमध्ये विजय थलापतीचे काम पोहोचले आहे. त्याचा त्याला राजकारणातही मोठा फायदा होईल, असे बोलले जात आहे. 

स्थानिक राजकारणात होता विजयचा सहभाग 

विजय थलापती यापूर्वी स्थानिक राजकारणात सक्रिय होता. सोशल मीडियावरही त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे थलापतीची राजकीय कारकिर्द कशी असेल? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. सिनेक्षेत्रात आपल्या भूमिकांतून चाहत्यांच्या पसंतीस उतरणारा विजयला दक्षिणेतील लोक राजकारणात किती साथ देणार? हे पाहावे लागेल. 2018 मध्ये थुथुकडी पोलीस फायरिंगच्या प्रकरणानंतर विजयचा राजकारणातील सहभाग वाढला होता. विजय 2026 मध्ये राजकारणात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यापूर्वीच तो राजकीय कारकिर्दीला सुरुवात करेल, असे बोलले जात आहे. 

दक्षिणेतील अनेक अभिनेत्यांनी केलाय राजकारणात प्रवेश 

सिनेक्षेत्रात राजकारणात एंट्री करण्यासाठी उत्सुक असलेला विजय हा पहिलाच अभिनेता नाही. यापूर्वी दक्षिणेतील अनेक अभिनेत्यांनी राजकारणात पदार्पण करुन मोठं यश मिळवलंय. एनटी रामाराव, जय ललिता, कमल हसन, पवन कल्याण, रजनीकांत अशा अनेक अभिनेत्यांनी राजकारणात एंट्री घेत यश मिळवलंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay (@actorvijay)

इतर महत्वाच्या बातम्या

Kanguva : बॉबी देओलचे वाढदिनी चाहत्यांना मोठे गिफ्ट, 'कंगुवा'तील लूक प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget