Dhanush and Aishwarya Divorce : धनुष आणि ऐश्वर्याच्या घटास्फोटनंतर सौंदर्या रजनीकांतकडून पोस्ट शेअर, म्हणाली....
Aishwarya and Dhanush Divorce : सौंदर्या रजनीकांतनं (Soundarya Rajinikanth ) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Soundarya Rajinikanth On Aishwarya and Dhanush Divorce : प्रसिद्ध अभिनेता धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांची घटस्फोटाबद्दल माहिती दिली. नुकतीच ऐश्वर्याच्या बहिणीनं म्हणजेच सौंदर्या रजनीकांतनं (Soundarya Rajinikanth ) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सौंदर्यानं सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि तिचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रजनीकांत देखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करून सौंदर्यानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅशटॅग न्यू प्रोफाइल फोटो.'
#NewProfilePic pic.twitter.com/0SnIQYvkkg
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) January 17, 2022
ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,"मित्र, जोडपे, आई-वडील आणि एकमेकांचे हितचिंतक म्हणून 18 वर्षे एकत्र राहण्याचा हा प्रवास समजूतदारपणाचा, जुळवून घेण्याचा होता. पण आज आम्ही दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा".
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
धनुषचा नुकताच 'अतरंगी रे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात धनुषने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी असून ती चित्रपट दिग्दर्शक आणि पार्श्वगायिका देखील आहे.
महत्वाच्या बातम्या
अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट; 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha