Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमाचा मुहूर्त अखेर ठरला, 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
Pawankhind Movie : 18 फेब्रुवारीला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा पावनखिंड सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
Pawankhind Movie : फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता 'पावनखिंड' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 21 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा सिनेमा 18 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत लिहिले आहे, स्वराज्य रक्षणासाठी रचलेल्या रणसंग्रामाचं अग्निकुंड आपल्या भगव्या रक्ताने धगधगतं ठेवणाऱ्या मराठ्यांच्या स्वामीनिष्ठेची, त्यागाची आणि पराक्रमाची गौरवगाथा म्हणजे पावनखिंड....18 फेब्रुवारी 2022 रोजी फक्त चित्रपटगृहात!"
View this post on Instagram
'पावनखिंड' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर झळकणार आहे.
संबंधित बातम्या
Birju Maharaj : एका युगाचा अंत; पंडित बिरजू महाराजांना दिग्दर्शक अनिल शर्मांची श्रद्धांजली
'पुष्पा'नंतर आता अल्लू अर्जुनची चाहत्यांना आणखी एक भेट; यावर्षी 'हा' चित्रपट होणार रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha