एक्स्प्लोर

Dr. Arora : मनोरंजनच नव्हे, समाज प्रबोधनही! लैंगिक समस्यांवर गंभीर भाष्य करणारी 'डॉ. अरोरा' वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Dr. Arora : ‘डॉ. अरोरा - गुप्‍त रोग विशेषज्ञ'  ही वेब सीरिज 22 जुलैपासून सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच समाजाचे प्रबोधन केले जाणार आहे.

Dr. Arora Web Series : सोनी लिव्‍हचा कॉमेडी ड्रामा 'डॉ. अरोरा - गुप्‍त रोग विशेषज्ञ' (Dr. Arora) या वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्‍च झाल्‍यापासून, ती प्रेक्षकांमध्‍ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनली आहे. प्रेक्षकही उत्‍सुकतेने या सीरिजच्‍या प्रिमिअरची वाट पाहत आहेत. ‘डॉ. अरोरा’ ही सीरिज एक लैंगिक सल्‍लागार आणि त्‍यांच्‍या अनेक रूग्‍णांचे जीवन व त्यांच्या समस्यांना सादर करते. अभिनेता विवेक मुश्रान यांनी याच व्यवसायाचा पूर्वजांचा वारसा असलेल्या एका व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. ज्ञानाचा अभाव आणि पुराणमतवादी मानसिकतेमुळे, तो आपल्या मुलाच्या इच्छा समजून घेण्याविरुद्ध बंड करतो.

‘डॉ. अरोरा - गुप्‍त रोग विशेषज्ञ'  ही वेब सीरिज 22 जुलैपासून सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच समाजाचे प्रबोधन केले जाणार आहे.

आशा आहे आता तरी लोकांना या गोष्टी कळतील!

या सीरिजबाबत सांगताना विवेक मुश्रान यांनी लैंगिक समस्‍यांबाबत चर्चा करणाऱ्या लोकांकडे कशाप्रकारे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे याबाबत आपले मत व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, ‘आजकाल आपण वर्तमानपत्रामध्‍ये लैंगिक समस्‍यांवरील स्‍तंभ वाचतो, तेव्‍हा या समस्या अनुभवणाऱ्या व्‍यक्‍तींबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी हसतो आणि त्याची सहज थट्टा करतो. 'डॉ. अरोरा' ही सीरिज या वस्तुस्थितीबाबत आपल्‍याला जाणीव करून देते की, लैंगिक समस्या वारंवार हलक्या-फुलक्या व मनोरंजन या दृष्टीनेच पाहिल्या जाऊ शकत नाहीत. त्या एखाद्या व्यक्तीसाठी अत्यंत त्रासदायक असू शकतात. मला आशा आहे की, ही सीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षक हे समजून घेतील आणि अधिक संवेदनशील होतील की, त्यांना जे मनोरंजन वाटते, त्याचा प्रत्यक्षात अनुभवत असलेल्या व्यक्‍तींसाठी ती एक अत्यंत भयावह परिस्थिती असते.’

मध्‍य भारताची पार्श्वभूमी असणाऱ्या या सीरिजमध्‍ये प्रतिभावान अभिनेत्री कुमुद मिश्रा प्रमुख भूमिकेत झळकत आहे. इम्तियाज अली निर्मित या सीरिजचे दिग्‍दर्शन साजिद अली व अर्चित कुमार यांनी केले आहे. तसेच, मोहित चौधरी निर्माता असलेल्‍या या सीरिजमध्‍ये गौरव पराजुली, विवेक मुश्रान, अजितेश गुप्‍ता, विद्या माळवदे, संदीपा धार आणि शेखर सुमन हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘डॉ. अरोरा - गुप्‍त रोग विशेषज्ञ'  ही वेब सीरिज 22 जुलैपासून सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.या वेब सीरिजच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच समाजाचे प्रबोधन केले जाणार आहे.

हेही वाचा :

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News Live Updates 13 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget