एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

गृहिणीचं आयुष्य दाखवणारी नवी मालिका, ‘तू चाल पुढं’मधून दीपा परबचं छोट्या पडद्यावर पुनरागमन!

अभिनेत्री दीपा परब हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

कविवर्य शांताराम नांदगावकरांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न

शब्दांचा राजा आणि एक अजातशत्रू म्हणजेच डॅडी कविवर्य शांताराम नांदगावकर यांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा नुकताच भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शांताराम नांदगावकर फाउंडेशनतर्फे मिरा रोड येथे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत या सोहळा पार पडला. 

कॉफी विथ करणमध्ये साराचा गौप्यस्फोट

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करण 7 चा पहिला एपिसोड सुपरहिट ठरला आहे. या एपिसोडने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कॉफी विथ करणचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड आहे.  आता या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जाह्नवी कपूर या दोघी हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आला आहे.

... तर सलमान खानला जीवानिशी मारू! लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा एकदा ‘भाईजान’ला धमकी

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान मोठी गोष्ट सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई या चौकशीत म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला माफ करणार नाही.

'मन उडू उडू झालं' मालिकेतून सोनटक्के सरांनी घेतला निरोप

'मन उडू उडू झालं' या मालिकेत सध्या नव-नवे ट्विस्ट येत आहेत. मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वी कानविंदे कुटुंबाने या मालिकेतून निरोप घेतलेला पाहायला मिळाला. आता या मालिकेतून सोनटक्के सर एक्झिट घेत आहेत. 

'अनन्या'ची जिद्द जागवणार 'तू धगधगती आग'

'अनन्या' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रताप फड दिग्दर्शित या सिनेमातील 'तू धगधगती आग' हे स्फूर्तीदायी गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  या जबरदस्त गाण्याला बॉलिवूडचे सुपरहिट गायक विशाल ददलानी यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. अभिषेक खणकरचे बोल असलेले हे गाणं समीर साप्तीस्करने संगीतबद्ध केलं आहे. 

अथिया शेट्टी तीन महिन्यांत चढणार बोहल्यावर; के एल राहुलसोबत अडकणार लग्नबंधनात

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट केलं जात आहे. त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रिपोर्टनुसार, पुढल्या तीन महिन्यांत के एल राहुल आणि अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकणार आहेत. 

राजकुमार रावच्या 'हिट- द फर्स्ट केस' सिनेमातील 'तिनका' गाणं रिलीज

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा सध्या त्यांच्या आगामी 'हिट- द फर्स्ट केस' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'तिनका' हे गाणं रिलीज झालं आहे. 

रणवीर सिंहने बेयर ग्रील्सवर केला चुंबनाचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह नुकताच बेयर ग्रील्सच्या शोमध्ये झळकला होता. या शोमधून रणवीरची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ क्लीप बेयर ग्रील्सच्या शो मधली आहे. मात्र, या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर सिंह बेयर ग्रील्सवर चुंबनाचा वर्षाव करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.

'कोटा फॅक्ट्री' फेम जीतू भैयाने घेतली 42 लाखांची कार

अभिनेता जितेंद्र कुमार सध्या चर्चेत आहे. 'कोट्रा फॅक्ट्री', 'पंचायत' अशा अनेक गाजलेल्या वेबसीरिजमध्ये जितेंद्रने काम केलं आहे. या वेबसीरिजमुळे जितेंद्रला एक वेगळी ओळख मिळाली आहे. आता जितेंद्र पुन्हा चर्चेत आला आहे. जितेंद्रने 42 लाखांची एक महागडी कार खरेदी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Embed widget