Entertainment News Live Updates 13 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
गृहिणीचं आयुष्य दाखवणारी नवी मालिका, ‘तू चाल पुढं’मधून दीपा परबचं छोट्या पडद्यावर पुनरागमन!
अभिनेत्री दीपा परब हिने मालिका, चित्रपट आणि नाटक या तिन्ही माध्यमांत विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. ‘दामिनी’ या सुप्रसिद्ध मालिकेतील दीपाच्या अविस्मरणीय भूमिकेनंतर ती पुन्हा एकदा मराठी मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. दीपाने मधल्या काळात अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. पण, बऱ्याच वर्षांनी दीपा आता मराठी टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
कविवर्य शांताराम नांदगावकरांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न
शब्दांचा राजा आणि एक अजातशत्रू म्हणजेच डॅडी कविवर्य शांताराम नांदगावकर यांचा 12 वा स्मृतीदिन सोहळा नुकताच भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शांताराम नांदगावकर फाउंडेशनतर्फे मिरा रोड येथे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत या सोहळा पार पडला.
कॉफी विथ करणमध्ये साराचा गौप्यस्फोट
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या सातव्या सिझनला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करण 7 चा पहिला एपिसोड सुपरहिट ठरला आहे. या एपिसोडने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. कॉफी विथ करणचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला गेलेला एपिसोड आहे. आता या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जाह्नवी कपूर या दोघी हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आला आहे.
... तर सलमान खानला जीवानिशी मारू! लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा एकदा ‘भाईजान’ला धमकी
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या चौकशीदरम्यान मोठी गोष्ट सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई या चौकशीत म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला माफ करणार नाही.
'मन उडू उडू झालं' मालिकेतून सोनटक्के सरांनी घेतला निरोप
'मन उडू उडू झालं' या मालिकेत सध्या नव-नवे ट्विस्ट येत आहेत. मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. काही दिवसांपूर्वी कानविंदे कुटुंबाने या मालिकेतून निरोप घेतलेला पाहायला मिळाला. आता या मालिकेतून सोनटक्के सर एक्झिट घेत आहेत.