Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाला दिलासा; अजामीनपात्र वॉरंटवर आला मोठा निर्णय
सोनाक्षी अलाहाबाद कोर्टामध्ये हजर राहिली. जिथून तिला आता जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे.
Sonakshi Sinha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सोनाक्षी सिन्हावर मुरादाबादमध्ये फसवणुकीचा खटला सुरू आहे. मुरादाबाद येथील न्यायदंडाधिकारी स्मिता गोस्वामी यांच्या समोर प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी खटल्यातील फिर्यादी प्रमोद शर्मा यांनी सोनाक्षी सिन्हा सतत न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. ज्यानंतर सोनाक्षी अलाहाबाद कोर्टामध्ये हजर राहिली. आता तिला आता जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
मुरादाबाद येथील कटघर पोलीस ठाण्याच्या परिसरातील शिवपुरी कॉलनीमध्ये रहणाऱ्या प्रमोद शर्मा यांची एक इव्हेंट कंपनी आहे. ही इव्हेंट कंपनी वेगवेगळ्या सेलिब्रिटींना कार्यक्रमाला आमंत्रित करते. एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी या कंपनीनं सोनाक्षीकडे विनंती केली. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी होणार होता. पण ऐनवेळी सोनाक्षी आणि तिच्यासोबत येणाऱ्या सहकलाकारांनी कार्यक्रमाला येण्यास नकार दिला. पण या कलाकारांनी प्रमोद शर्मा यांच्याकडून पूर्ण फी घेतली होती.
पाच ऑगस्ट रोजी होणार सुनावणी
22 फेब्रुवरी 2019 मध्ये मुरादाबादच्या कटघर पोलीस ठाण्यात प्रमोद शर्मा यांनी तक्रार नोंदवली. या खटल्याची सुनावणी मुरादाबादच्या न्यायदंडाधिकारी स्मिता गोस्वामी यांच्याकडे होत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि अभिषेक सिन्हा या खटल्यात हजर न राहिल्यामुळे कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मुरादाबाद येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मात्र न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटविरोधात सोनाक्षी सिन्हाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच ऑगस्टला होणार आहे.
संबंधित बातम्या