Smriti Mandhana Palash Education: ती मैदान मारणारी तो संगीतकार .. स्मृती मंधना - पलाशमध्ये कोण अधिक शिकलंय?
दोघांचे क्षेत्र जरी वेगळे असले तरी शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा बराचसा मिळता जुळता आहे.

Smriti Mandhana Marriage: भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल या दोघांचं आज (23 नोव्हेंबर) लग्न आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्मृती आणि पलाश यांच्या लग्नापूर्वीचे समारंभ सुरू आहेत. या समारंभांची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. पलाश आणि स्मृती यांच्या हायप्रोफाईल लग्नाला चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेक सेलिब्रिटी, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्मृतीचा मैदानावरील वावर आणि चाहता वर्ग हा सर्वश्रुत आहेच. पण स्मृती शिक्षणातही मागे नाही. दुसरीकडे पलाश मुच्छल इतक्या कमी वयात लोकप्रिय झालाय. हे दोघेही आपल्या शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत सजग आहेत. कोणाचं किती शिक्षण झालंय? पाहूया...
स्मृती मंधानाचं शिक्षण किती ?
स्मृती मंधनाचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिचं सगळं बालपण सांगलीतील माधव नगरमध्ये गेलंय. तिनं तिचं शिक्षण तिथल्याच एका शाळेत घेतलं. तिथेच तिला आपला रस क्रिकेटमध्ये असल्याचं जाणवलं. शालेय शिक्षणासोबतच तिने व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची तयारी सुरू ठेवली. इंटरमिजिएटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने वाणिज्य शाखेत सांगलीतीलच चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला.
दुसरीकडे तिच्या क्रिकेटच्या स्पर्धा शिबिरे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने सुरूच होते. मात्र तरीही स्मृतीने बीकॉम पदवी पूर्ण केली. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिने पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित केले.
पलाश मुच्छल किती शिकलाय?
पलाश मुच्छल हा म्युझिक कंपोजर आणि फिल्म मेकर असून तो मूळ इंदोरचा आहे. इंदौरच्या क्वीन्स कॉलेजमध्ये त्यांना शिक्षण घेतलं असून शिकत असतानाच तो संगीत रचना करायचा. गाणी कंपोज करायचा. त्याचा कल संगीताकडे अधिक असला तरी शिक्षणाच्या बाबतीत त्यानेही तडजोड केलेली नाही. त्यानेही वाणिज्य शाखेतूनच पदवी मिळवली आहे. त्याच्या कॉलेजच्या काळात तो स्टुडिओमध्ये काम करायचा. सुरुवातीच्या काही संगीत प्रकल्पांमुळे त्याला या क्षेत्रात ओळख मिळू लागली.
पलाशने औपचारिक शिक्षण कधीच सोडले नाही. वाणिज्य शाखेतील पदवीधर झाल्यानंतर त्याने व्यावसायिक संगीताचे रीतसर प्रशिक्षण घेतले आणि पूर्णपणे संगीत क्षेत्रात उतरला. व्यवहारिक अनुभवांसोबतच त्याने संगीत रचना करण्याचं तांत्रिक कौशल्यही शिकून घेतलं.
स्मृती आणि पलाश या दोघांच्याही औपचारिक पदव्या बद्दल बोलायचं झाले तर दोघेही पदवीधर आहेत. स्मृतीने बीकॉम पूर्ण केले आहे.तर पलाशनेही बीकॉम पूर्ण करत नंतर संगीताचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेला आहे. दोघांचे क्षेत्र जरी वेगळे असले तरी शिक्षणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा बराचसा मिळता जुळता आहे.
स्मृती आणि पलाशचा रोमांटिक डान्स
कुठल्याही लग्नातील संगीतमध्ये आकर्षण असते ते नवरा नवरीच्या रोमँटिक डान्सचं. स्मृती आणि पलाशनेही सलमान खानच्या सलामे इश्क चित्रपटातील 'तेनु लेके मे जवांगा ' या गाण्यावर नृत्य केले. स्मृतीने पलाशच्या गळ्यात हार घातला आणि ते एकत्र थिरकले. नंतर मिठी मारत सिग्नेचर स्टेप केली. त्यावेळी उपस्थितांचा आनंद उफाळून आला होता. त्यांच्या डान्सला टाळ्यांच्या कडकडाट आणि उत्साहात प्रतिक्रिया दिली. नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
























