एक्स्प्लोर

Siddarth Jadhav : सिद्धार्थ जाधव तेजस्विनी पंडितला म्हणतोय, "मी तुला त्या नजरेनं कधी पाहिलं नाही?"; नेमकं प्रकरण काय?

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने 'बांबू' या सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं असून सिद्धार्थने एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Siddarth Jadhav On Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या 'बांबू' (Bamboo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. दरम्यान, सिद्धार्थ जाधवने (Siddarth Jadhav) एक खास पोस्ट शेअर करत तेजस्विनी पंडितला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सिद्धार्थने लिहिलं आहे,"तेजस्विनी पंडित अर्थात 'बंड्या' तू एक उत्तम अभिनेत्री आहेसच... तुला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा तेव्हा तू आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहेस. आज एक निर्माती म्हणून तू लोकांसमोर येत आहेस, ही अभिमानाची गोष्ट आहे. सहाय्याक निर्माती म्हणून तू काम केलं आहेस, पण 'बांबू'च्या माध्यमातून निर्माती म्हणून तुझं नाव रुपेरी पडद्यावर झळकणार आहे". 

सिद्धार्थनं पुढे लिहिलंय,"माझी मैत्रिण आयुष्यात एक एक गोष्ट स्वत:च्या हिमतीवर मिळवतेय याचा विलक्षण आनंद आहे मला 'बंड्या'. 'येरे येरे पैसा' सिनेमातला सन्नी बबलीला म्हणतो ना "बबली, तू बडी हो गई रे", त्याचप्रमाणे हा तुझा मित्र बंड्या पण तुला हेच म्हणतोय,"तेजू तू बडी हो गई रे. आयुष्यात तू अजून खूप मोठी हो... एवढ्याच आभाळभर शुभेच्छा... आय लव्ह यू बंड्या... मला आहे आहे तू बोलशील मी तुला त्या नजरेने कधी पाहिलंच नाही... पण तरीही आय लव्ह यू." 

View this post on Instagram
 
A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

तेजस्विनीने मानले आपल्या सिद्धूचे आभार!

सिद्धार्थच्या या पोस्टवर तेजस्विनी पंडितने आभार मानत लिहिलं आहे, "थॅंक यू' हा खरचं छोटा शब्द आहे. खरंतर माझी ही धावपळ, स्ट्रगल, स्ट्रेस आणि माझ्या सगळ्या आनंदाच्या क्षणांचा तू कायम एक साक्षीदार म्हणून होतास. पण त्याही पलीकडे जाऊन तू माझा हात घट्ट धरुन उभा राहिलास. निस्वार्थपणा हा आपल्या इंडस्ट्रीत क्वचितच आढळतो. त्यामुळे तुझ्यासारखा मोठा तूच! बाकी काही कमावलं की, नाही माहिती नाही. पण, तुझ्यासारखा मित्र कमावला एवढं नक्की". 

तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत. अनेक सिनेमांत त्यांनी एकत्र काम केलं आहे. तेजस्विनीचा 'बांबू' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेमात लागलेल्या अनेक 'बांबूं'ची गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर सिद्धार्थ सध्या 'आता होऊ दे धिंगाणा' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Tejaswini Pandit : 'हे' लोक समोर आले की...; तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati Visit : अजित पवार बारामतीत, भल्या पहाटे केली विकास कामांची पाहणीABP Majha Headlines : 12 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal on Sharad Pawar : Amol Mitkari On Sharad Pawar : त्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Embed widget