एक्स्प्लोर

मराठीत सिनेसृष्टीत नेपोटीझम असला तरीही चुकीचं नाही, नेपोटीझमच्या मुद्द्यावर सुनील तावडेंच्या लेकांनं स्पष्टच म्हटलं

Shubhankar Tawde on Nepotism : अभिनेता शुभंकर तावडे याने नुकतच एका मुलाखतीमध्ये नेपोटीझमच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

Shubhankar Tawde on Nepotism : बॉलीवूडमध्ये नेपोटीझम हा मुद्दा फार चर्चेत असतो. तसेच आता मराठी सिनेसृष्टीतही नेपोटीझम आहे का अशाही चर्चा अनेकदा होतात. यावर अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawde) यांचा मुलगा शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) याने त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मराठी सिनेसृष्टीत नेपोटीझम नाहीये आणि तो असला तरीही त्यात काही चुकीचं नाहीये, असं शुभंकर म्हणाला आहे. सध्या शुभंकर हा त्याच्या आगामी कन्नी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शुभंकरचा कन्नी हा सिनेमा येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

शुभंकरने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावर नेपोटीझमच्या मुद्द्यावर बोलताना शुभंकरनं नेपोटीझमच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तसेच त्याने यावेळी या मुद्द्यावरचं त्याचं स्पष्ट मतंही व्यक्त केलंय. ही खूप कॉमेडी गोष्ट आहे, आता मलाही माझ्या वडिलांना कामासाठी फोन करावे लागतात. आमचं क्षेत्र हे थेट लोकांसमोर येतं त्यामुळे त्यावर तुम्ही डायरेक्ट बोट ठेवू शकता, असंही शुभंकर यावेळी म्हणाला आहे. 

इतर लोकांना असं वाटतं.... - शुभंकर तावडे

नेपोटीझमच्या प्रश्नावर भाष्य करताना शुभंकर म्हणाला की, मला नाही वाटत की मराठी सिनेसृष्टीत नेपोटीझम आहे. कारण अनेकदा माझ्या वडिलांनाही आता कामासाठी फोन करावे लागतात. ही खूप कॉमेडी गोष्ट आहे की, लोकांना असं वाटतं की इथे नेपोटीझम आहे. उद्या समजा मी निर्माता झालो तर हृताच्या मुलीला किंवा मुलाला मी नक्कीच संधी देईन. कारण हृता माझी खूप चांगली मैत्रीण आहे किंवा हृताही असं करु शकेल. आमचं क्षेत्र हे जास्त लोकांसमोर येतं म्हणून हे खूप दिसंत. पण तुम्ही डॉक्टर्स घ्या, स्टॉक मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या फॅमिली असो किंवा किराणा माल सांभाळणारे दुकानदार असो, ही माणसं त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्याच गोष्टी करायला सांगतात. फक्त क्रिकेट, स्पोर्ट्स ही क्षेत्रं लोकांच्या ठळकपणे समोर दिसतात, त्यामुळे तुम्ही यावर थेट बोट ठेवू  शकता. 

मराठी म्हणजे घराणेशाही असं काही नसतं

पुढे बोलताना शुभंकरने म्हटलं की, समजा की तुमचे काही नातेवाईक मीडिया हाऊसमध्ये काम करत असतील, तर त्यांना कोणीही विरोध करणार नाही. मला मराठी म्हणजे घराणेशाही आणि या सगळ्या गोष्टी आहेत, असं काही वाटत नाही.   आम्ही केलेल्या सगळ्याचं गोष्टी लोकांसमोर येतात, त्यामुळे मला नाही वाटत की मराठीत नेपोटीझम आहे आणि असला तरी तो काही चुकीचा नाही आणि फक्त मराठीतच नाही, तर तो कुठेही असला तरी चुकीचाच आहे. लोकं ठरवतात अनेकजण स्वतःला इंडस्ट्रीत लॉन्च केलंय पण त्यांचं काम नाही चांगलं झालं, जे नंतर बाहेरही गेले. त्यामुळे लोकं ठरवतात. 

ही बातमी वाचा : 

Marathi Actress Wedding Mangalsutra : शाही विवाह सोहळे, आकर्षक लूक; पण चर्चा मात्र अभिनेत्रींच्या पारंपारिक मंगळसूत्राचीच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Embed widget