Marathi Actress Wedding Mangalsutra : शाही विवाह सोहळे, आकर्षक लूक; पण चर्चा मात्र अभिनेत्रींच्या पारंपारिक मंगळसूत्राचीच
Marathi Actress Wedding Mangalsutra : सध्या मराठी कलाविश्वातील अभिनेत्रींच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. तसेच त्यांच्या पारंपारिक मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Marathi Actress Wedding Mangalsutra : मागील अनेक दिवसांपासून कलाविश्वात लगीनसराई सुरु आहे. ऑन स्क्रिन लग्नसोहळा अनुभवणाऱ्या कलाकरांनी त्यांच्या रिअय आयुष्यातला लग्नसोहळाही अत्यंत खास पद्धतीने केलाय. मागील काही दिवसांमध्ये गौतमी देशपांडे - स्वानंद तेंडूलकर (Gautami Deshpande - Swanand Tendulkar), स्वानंदी टीकेकर-आशिष कुलकर्णी (Swanandi Tikekar - Ashish Kulkarni), तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके (Titeeksha Tawde - Sidharth Bodke), पूजा सावंत- सिद्धेश चव्हाण (Pooja Sawant - Sidhesh Chavan) या कलाकारांनी त्यांच्या वैवाहिक जीवानाची सुरुवात केली. त्यांचा लग्नातला लूक, शाही विवाहसोहळे या सगळ्यांमध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्रींच्या पारंपारिक मंगळसूत्रांनीच.
अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात पेस्टल थीम सिलेक्ट केली होती. तसेच काहींनी त्याचा विवाहसोहळा शाही पद्धतीने केला. या सर्वामध्ये अभिनेत्रींच्या मंगळसूत्राने मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. ऑन स्क्रिन अनेक अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची चर्चा होते. यामधील अनेक मंगळसूत्र ही अभिनेत्रींच्या पात्रांच्या नावाने अगदी फेमस देखील होतात. पण या अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात मात्र पारंपारिक मंगळसूत्राची निवड केली.
अभिनेत्रींनी केली पारंपारिक मंगळसूत्राची निवड
या अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी पारंपारिक मंगळसूत्राची निवड केली. काळे मणी, दोन वाट्या अशी पारंपारिक डिझाईन या अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची आहे. मंगळसूत्र हा प्रत्येकीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातच अभिनेत्रींच्या लूक पासून त्यांच्या दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा केली जाते. त्यामुळे अनेकांना या गोष्टीची फार उत्सुकता देखील असते. पण या अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नामध्ये साध्या आणि पारंपारिक मंगळसूत्राची निवड केल्याचं पाहायला मिळालं.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
अभिनेत्रीच्या लूकचीही चर्चा
गौतमी देशपांडे आणि तितिक्षा तावडे या दोघींनीही त्यांच्या लग्नासाठी पेस्टल थीमची निवड केली होती. गौतमीने ऑफ व्हाईट आणि गुलाबी रंग कॉनट्रास्ट असलेली साहवारी साडी नेसली होती. त्यावर तिने गुलाबी रंगाचा शेला घेतला होता. तसेच तितिक्षाने तिच्या लग्नात मोती रंगाची नऊवारी नेसली होती, त्यावर तिने गोल्डन रंगाचा शेला घेतला होता. त्यामुळे या दोघींच्या लग्नात त्यांच्या पेस्टल थीमची जास्त चर्चा झाली. तर अभिनेत्री स्वानंदी टीकेकर हीने तिच्या लग्नात राणी रंगाची नऊवारी पैठणी नेसली होती त्यावर तिने नारंगी रंगाचा पैठणीचा शेला घेतला होता. स्वानंदीच्या लग्नात तिच्या पैठणी थीमची बरीच चर्चा झाली होती. पूजा सावंत हीने देखील तिच्या लग्नात काठाची नऊवारी नेसली होती. तिच्या शाही विवाह सोहळ्याने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतलं.