(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shubhangi Gokhale Social Media Post : 'पंधरा-वीस वर्षांपासून नुसता वैताग आणलाय...', शुभांगी गोखलेंची संतप्त फेसबुक पोस्ट चर्चेत, नेमकं प्रकरण काय?
Shubhangi Gokhale Social Media Post : शुभांगी गोखले या मुंबईतील ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांमुळे आणि त्यांना पालक जेव्हा सोडायला येतात त्यावेळी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या त्रास सोशल मीडियावर मांडलाय.
Shubhangi Gokhale Social Media Post : अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या कलाकारांच्या पोस्ट अनेकदा चर्चेत येतात. बऱ्याच पोस्ट या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल देखील होतात. कलाकारांच्या आयुष्यातले अनुभव शेअर करण्यासाठी सोशल मीडिया त्यांच्यासाठी एक उत्तम माध्यम ठरतं. अनेक विषयांवरचे त्यांचे अनुभव, त्याची कारणमिमांसा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवणं हे कलाकारासांठी फार सोप्पं होतं. अशातच एका अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत सध्या आलीये. अभिनेत्री शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale) यांनी नुकतच त्यांच्या परिसरातील एका समस्येवर भाष्य केलं आहे.
शुभांगी गोखले या मुंबईतील ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांमुळे आणि त्यांना पालक जेव्हा सोडायला येतात त्यावेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास सोशल मीडियावर मांडलाय. त्यामुळे शुभांगी गोखले यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आलीये. गेल्या पंधरा वर्षांपासून हा त्रास होत असल्याचं शुभांगी गोखले यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटलंय. त्याचप्रमाणे अनेकदा शाळेला मेल करुनही शाळेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचं शुभांगी गोखलेंनी सांगितलं .
शुभांगी गोखलेंची पोस्ट नेमकी काय?
मुंबईतल्या गोरेगाव पूर्व भागात अभिनेत्री शुभांगी गोखले यांचं घर आहे. तसेच इथल्या रस्त्याला देखील दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांचं नाव देण्यात आलंय. शुभांगी गोखले ज्या इमारतीमध्ये राहतात, त्याच इमारतीच्या शेजारी ऑबेरॉय इंटरनॅशनल स्कूल आहे. पण या शाळेमुळे मागील 15 वर्षांपासून त्रास होत असल्याचं शुभांगी गोखले यांनी म्हटलं आहे. तसेच अनेकदा शाळेला तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यासाठी शाळेला अनेक मेलही पाठवल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे शुभांगी गोखले यांनी आता सोशल मीडियावरुन ही समस्या मांडली आहे.
घर सोडून सोडून पळून जावं असं वाटतं - शुभांगी गोखले
शुभांगी गोखले यांच्यासह त्यांच्या इमारतीमधील अनेक नागरिकांनी देखील यासंदर्भात अनेकदा तक्रार केली आहे. पण त्याचाही दखल घेतली नसल्याचा दावा या पोस्टमधून केलाय. दरम्यान त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना यामुळे कशाप्रकारे त्रास होतो हे स्पष्ट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, इथला आवाज आणि ट्रॅफिक इथल्या मुलांमुळे होतं. या मुलांना सोडायला, आणायला येणाऱ्या गाड्यांमुळे इथे सगळ्या गाड्या अडतात. माझ्या परिसरामध्ये एकूण पाच शाळा आहेत, त्या स्कूल बसही इथूनच जातात. त्यामुळे हे घर सोडून पळून जावं हा निर्णय घेण्याइतकं हे संकट रोज असतं, असं त्यांनी म्हटलं आहे.